Homeपुणेप्रभाग ७ मध्ये निवडणुकीची सरगर्मी वाढली; राजकीय तापमान चढले, मतदारही सज्ज!

प्रभाग ७ मध्ये निवडणुकीची सरगर्मी वाढली; राजकीय तापमान चढले, मतदारही सज्ज!

हरीश शर्मा – मुख्य संपादक। दि. 9 नोव्हेंबर         

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ (वाकडेवाडी – गोखलेनगर परिसर) मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, गल्लीबोळात राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे. मतदारांच्या गप्पांतून उमेदवारांची नावं, कामगिरी आणि आगामी लढतींची समीकरणं ठरवली जात आहेत.
या प्रभागात पारंपरिक राजकीय बालेकिल्ले असले तरी यंदा परिस्थिती काहीशी वेगळी दिसते. जुन्या नगरसेवकांसोबत नव्या चेहऱ्यांचीही चर्चा सुरू आहे. काही अनुभवी उमेदवार पुन्हा संधी शोधत आहेत, तर शिक्षित, तरुण आणि समाजकार्याचा अनुभव असलेले नवे चेहरे जनतेसमोर आपला अजेंडा मांडण्यासाठी सक्रिय झाले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना त्रासदायक ठरत असलेले मुद्दे —  झोपडपट्टयांमधील एसआरए मुद्दा, अनीयमित पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, आणि कचरा व्यवस्थापन — या निवडणुकीत प्रमुख चर्चेचे विषय ठरले आहेत. मतदारांकडून “बोलणारा नव्हे, काम करणारा उमेदवार हवा” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या रणनीतींवर काम सुरू केले आहे. प्रचार समित्या तयार होत आहेत, कार्यकर्त्यांची बैठकांची मालिकाही सुरु झाली आहे. सोशल मीडियावरही प्रचार मोहिमेची धूम आहे. काही उमेदवारांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामद्वारे थेट संवाद साधण्याचा मार्ग अवलंबला आहे. विशेष करून आमदारकी लढविलेले उमेदवार ही रिंगणात आहेत.
स्वतंत्र उमेदवारांचं अस्तित्वही या वेळी जाणवण्याजोगं आहे. स्थानिक मुद्द्यांवर आवाज उठवणारे, लोकांशी थेट संपर्क असलेले काही कार्यकर्ते स्वतंत्र लढतीची तयारी करत आहेत. त्यामुळे त्रिकोणी लढतीचे चित्रही काही ठिकाणी दिसत आहे.
प्रभाग ७ मध्ये तरुण मतदारांचा मोठा हिस्सा आहे, आणि त्यांचा कल या वेळी निर्णायक ठरू शकतो. युवा पिढी विकास, रोजगार आणि स्थानिक सुविधा या मुद्यांवर अधिक जागरूक झाली आहे.
एकूणच, वाकडेवाडी–गोखलेनगर पाटील इस्टेट परिसरात निवडणुकीच्या दिशेने वातावरण रंगले आहे. प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार मतदारांच्या मनात जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या काही दिवसांत प्रचाराची गती आणखी वाढेल आणि कोणते चेहरे या प्रभागात पुढे येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!