Homeपुणे"माझा मित्र रुपेश... आठवणीत आजही जिवंत आहे!"

“माझा मित्र रुपेश… आठवणीत आजही जिवंत आहे!”

“लहानपणाचा साथी, आयुष्यभराची आठवण — रुपेश तुझी उणीव आजही जाणवते!”             

लेखक : हरीश शर्मा, संपादक — पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
आज 8 नोव्हेंबर…
माझ्या आयुष्यातील एक अत्यंत भावनिक दिवस. आज माझा लहानपणापासूनचा जिवलग मित्र रुपेश बाळासाहेब शिंदे याच्या निधनाला पूर्ण एक वर्ष झालं आहे. पण खरं सांगायचं तर, रुपेश गेल्यानंतरही तो माझ्या प्रत्येक आठवणीत, प्रत्येक श्वासात आहे.
१९८६ च्या सुमारास आम्ही दोघे पुणे महापालिकेच्या शाळेत पाचवी-सहावीला शिकत होतो. आमची घरची परिस्थिती साधीच होती, पण मन मात्र स्वप्नांनी भरलेलं. रुपेशच्या घरात शिस्त, नियम यांना मोठं स्थान होतं — कारण त्याचे वडील सैन्यात होते. त्या घरातून त्याने घेतलेली शिस्त आणि प्रामाणिकपणा ही त्याची खरी ओळख होती.
शाळा सुटल्यावर आम्ही सायकलवर संपूर्ण पुणे पालथं घालायचो. मित्र म्हणून आम्ही इतके जवळ होतो की, त्याच्याविना मला आणि माझ्याविना त्याला काहीच करमत नसे. त्याच्या घरी गेलो की त्याची आई मला जेवण देऊनच पाठवायची. माझ्या आईलाही ठाऊक — “रुपेशच्या घरी गेला म्हणजे काळजी नाही.”
नववीपर्यंत आम्ही एकत्र शाळेत गेलो, पण त्यानंतर रुपेशच्या आयुष्यात जबाबदाऱ्या आल्या. वडिलांच्या निधनानंतर त्याने घराची सर्व जबाबदारी खांद्यावर घेतली. कष्ट, प्रामाणिकपणा आणि कुटुंबासाठी जगण्याची तळमळ — हाच त्याचा धर्म होता.
मी पत्रकारितेत आलो, पुण्यनगरी, पुढारी ,प्रभात, लोकमत,सकाळ मध्ये पत्रकार म्हणून काम केले त्यावेळी ही रुपेश माझ कौतुक करायचा  आता  “पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live” ची सुरुवात केली, आणि त्या प्रत्येक टप्प्यावर रुपेश माझ्या पाठीशी उभा राहिला. माझं यश त्याचं आनंद होतं; माझं दु:ख त्याचं ओझं बनायचं.
पण नियतीने आमचं हे सुंदर नातं तोडलं.
एक दिवस कामावरून जाताना हडपसरजवळ रेल्वेगेटजवळ त्याची दुचाकी घसरली…
तेव्हापासून आजारपणाशी त्याची लढाई सुरू झाली. अनेक डॉक्टर, अनेक उपचार — पण त्याच्या शरीराने साथ सोडली.
आणि अखेर 2024 मध्ये तो कायमचा निघून गेला…
आज त्याच्या वर्षश्रद्धेच्या दिवशी त्याच्या आठवणींचा प्रवाह डोळ्यांतून वाहतो आहे. रुपेश गेला, पण त्याची मैत्री, त्याचा हसरा चेहरा, त्याचा शिस्तबद्ध स्वभाव — हे सगळं अजून माझ्या सोबत आहे.
मित्रा, तू गेलास, पण तू हरवलास नाहीस… तू माझ्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक आठवणीत कायम जिवंत आहेस.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!