शिवाजीनगर / प्रतिनिधी : दि. १० डिसेंबर २०२५ छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीच्या वतीने पदाधिकारी बैठक दिनांक ९ डिसेंबर ला पार पडली. विधानसभा कमिटी तसेच सेक्टर बुथ स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आगामी कार्ययोजनांवर सविस्तर चर्चा केली.
डॉ. हुलगेश चलवादी महासचिव तथा पश्चिम महाराष्ट्र पुणे झोन प्रभारी, यांच्या आदेशानुसार तसेच अशोक दादा गायकवाड पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी प्रभाकर खरात, प्रभारी पुणे जिल्हा व निरीक्षक किशोर अडागळे, अध्यक्ष छत्रपती शिवाजीनगर विधानसभा यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीस किरण गाडे, उपाध्यक्ष असिफ काझी, कोषाध्यक्ष , नीलेश भालेराव, बिव्हिएफ चंद्रकांत शिंदे, बामसेफ , विशाल बोथ, अध्यक्ष खडकी संतोष गायकवाड, अध्यक्ष जनवाडी, बाजीराव माने, महासचिव मुळा रोड, सेक्टर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठराव पास करण्यात आला. प्रभाग क्रमांक ७ (अनुसूचित जाति जमाती अ, महिला राखीव) या प्रभागासाठी सुरेखा ताई माने यांची एकमताने उमेदवार म्हणून निवड करण्यात आली.
बैठकीत आगामी निवडणुकीत पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















