
पुणे पीसीएमसी न्यूज 24 : खडकी / प्रतिनिधी
सकल मातंग समाज खडकी तर्फे
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली. खडकी येथील मुख्य बाजारपेठेतून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली होती. समाजबांधव व महिला ज्येष्ठ नागरिक मिरवणुकीत सामील झाले होते.
खडकी बाजारातील आण्णाभाऊ साठे चौकात मोठा स्टेज टाकून आण्णाभाऊंची प्रतिमा ठेवण्यात आली होती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . डी जे लेसर लाईट च्या तालावर तरुणाई थिरकली . खडकीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, यशवंत नडगम, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, वंचित बहुजन आघाडी खडकी ब्लॉक अध्यक्ष अभिजीत गडाअंकुश, काँग्रेसचे खडकी ब्लॉक अध्यक्ष भरतसिंग ठाकूर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष, सिल्वराज अँथनी, सामाजिक कार्यकत्या माया तांबे, सामाजिक कार्यकर्ते राहुल अवचिते, मातंग समाजाचे ज्येष्ठ, मोहन लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश ढेदुंडा, व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी सुजित वाघमारे, छत्रपती शिवाजी नगर मतदार संघाचे लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विशाल पवार , निलेश खुडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सकल मातंग समाज खडकी चे संस्थापक अध्यक्ष अविनाश साठे यांनी केले होते.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














