पुणे पीसीएमसी न्यूज 24: पणे / प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा पुणे
वर्षावास प्रवचन माला- 2025 पुष्प – ७ वे
चे आयोजन रविवार 3 ऑगस्ट
सायंकाळी ५ वाजता तक्षशिला बुध्द विहार, पाच बिल्डिंग चौका जवळ, १३ मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड, करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब सोनवणे
स्वागताध्यक्ष विजय बोकेफडे असणार आहे तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या ललिताताई बनसोडे, प्रमुख प्रवचनकार उपेक्षाताई वनशिव बौद्धाचार्या व महिला संस्कार विभाग सदस्या
“बौद्ध धम्मातील प्रमुख महिलांचे योगदान” या विषयावर प्रवचन असणार आहे या कार्यक्रमाकरिता सर्व सभासद, पदाधिकारी, धम्मप्रचारक, उपासक, उपासिका यांनी बहू संख्येनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन माता रमाबाई आंबेडकर रोड शाखेचे जनरल सेक्रेटरी निलेश गायकवाड यांनी केले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏
पुणे पीसीएमसी न्यूज 24: पणे / प्रतिनिधी













