खडकी / प्रतिनिधी : दि. 10 नोव्हेंबर
खडकी बाजार परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यांच्या कडेला तसेच स्क्वेअर मार्केट भागात अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर फळी, स्टँड, आणि कपड्यांचे स्टँड लावून रस्ता अडवल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाकडून केवळ नाममात्र तपासणी करण्यात येते. विभागाची गाडी बाजारातून फिरते, मात्र प्रत्यक्ष कारवाई फक्त छोट्या पथारीधारकांपुरतीच मर्यादित राहते, अशी स्थानिकांची चर्चा आहे.
स्क्वेअर मार्केट परिसरात अनेक कपड्यांच्या दुकानांबाहेर कपडे अडकवण्यासाठी स्टँड आणि फळी लावल्यामुळे नागरिकांना चालणे, वाहनांना वळणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत मार्ग मोकळा ठेवणे कठीण झाले आहे.
या संदर्भात नागरिकांनी मागणी केली आहे की
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने संपूर्ण बाजारपेठेची नियोजनबद्ध पाहणी करून सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवावे, आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व मोकळा रस्ता उपलब्ध करून द्यावा.
अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांकडून उचस्तरीय तक्रारी दाखल केल्या जातील, असा इशारा काही स्थानिकांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती घेण्याकरिता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या निरीक्षक स्वप्नाली देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता त्या म्हणाल्या ‘ अतिक्रमण विभागाची गाडी बाजारातून रोज फिरवण्यात येते , मात्र आता बोर्डाने अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना नोटीस दिली आहे येत्या दोन दिवसात खडकी बाजारातील दुकानासमोर केलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे ‘
फोटो : खडकी बाजारातील स्क्वेअर मार्केट मध्ये दुकानापुढे फळ्या लावून ग्राहकांना बसण्याची व रस्त्यावर व्यापार सुरू असल्यामुळे नागरिकांना येण्याजाण्यासाठी अडचण होत आहे. तसेच पुढे ही प्रत्येक दुकानदारांनी बाहेर रस्त्यावर स्टँड ला कपडे अडकून ठेवल्यामुळे आधीच अरुंद रस्ता आणखीन अरुंद झाला आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















