हरीश शर्मा | मुख्य संपादक : पुणे शहरात प्रवेश करतानाच बोपोडीत जर नागरिकांच्या डोळ्यासमोर विकासाऐवजी खंडर उभे राहत असेल, तर त्या शहराच्या विकासाच्या गप्पा कोणासाठी सुरू आहेत, हा प्रश्न बोपोडी आज ठळकपणे विचारत आहे.
oplus_34
हैरिस ब्रिजजवळ विठ्ठल-रखुमाई यांचे भव्य शिल्प, उद्यान आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली दहा वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात नारळ फोडला गेला. फलक लागले, घोषणा झाल्या, श्रेय घेण्याची चढाओढ झाली. मात्र काम अर्ध्यावरच थांबले. त्यानंतर मात्र त्या जागेवर फक्त माती, मोडकळीस आलेली संरचना आणि प्रशासनाची बेपर्वाई दिसते.
या दहा वर्षांत बोपोडीने अनेक राजकीय नेते पाहिले, पक्ष बदल पाहिले, सत्ता बदल पाहिली; पण एक गोष्ट बदलली नाही — अपूर्ण काम पूर्ण करण्याची राजकीय इच्छाशक्ती.
“वचनांची पुनरावृत्ती, कामाची अनुपस्थिती! बोपोडीतील अपूर्ण सुशोभीकरणावर मतदारांचा रोष”
सत्तेचा खुर्चीवर बसून फोटो काढणाऱ्यांना हे खंडर कधी दिसलेच नाही का? की बोपोडी फक्त निवडणुकीपुरतीच आठवणीत असते?
आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि पुन्हा एकदा बोपोडीला विकासाच्या गाजराची लालूच दाखवली जात आहे. “हे करू, ते करू, शहर सुंदर करू” अशा घोषणा पुन्हा ऐकू येत आहेत. मात्र बोपोडीतील मतदार आता स्पष्ट शब्दांत सांगत आहेत — “आधी दहा वर्षे काय केले ते सांगा, मग पुढच्या वचनांवर बोला.”
हा प्रश्न कुठल्या एका पक्षाचा नाही, तर सत्तेत बसलेल्या प्रत्येकाचा आहे. जे सत्तेत होते त्यांनी काम का पूर्ण केले नाही आणि जे सत्तेत नाहीत ते गप्प का राहिले? विकासाच्या नावाखाली सुरू केलेली कामे अर्ध्यावर सोडून देणे आणि नंतर निवडणुकीत पुन्हा त्याच मुद्द्यांवर मते मागणे, ही जनतेची थट्टा नाही तर काय? बोपोडीतील जनता आता भूलथापांना कंटाळली आहे. फोटोसेशन, भूमिपूजन आणि आश्वासनांची राजकारणाची जुनी स्क्रिप्ट आता चालणार नाही, हे मतदारांनी स्पष्ट केले आहे.
“काम दाखवा, मग मत मागा” हा बोपोडीचा आजचा अजेंडा आहे.
हा केवळ उद्यानाचा प्रश्न नाही, तर लोकप्रतिनिधींच्या विश्वासार्हतेचा आरसा आहे. आणि या आरशात आज सत्ताधाऱ्यांना स्वतःचेच अपयश स्पष्ट दिसत आहे.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप
नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026
गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप
नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026
गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...