Homeपुणेअजितदादांच्या पुणे–पिंपरी चिंचवडमध्ये मोफत बस-मेट्रो घोषणेचा कामगार संघटनांकडून तीव्र निषेध

अजितदादांच्या पुणे–पिंपरी चिंचवडमध्ये मोफत बस-मेट्रो घोषणेचा कामगार संघटनांकडून तीव्र निषेध

पुणे | प्रतिनिधी: दि.११ जानेवारी २०२६
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ जिंकल्यास बस व मेट्रो सेवा मोफत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातील ही घोषणा म्हणजे राजकारणातील घातक ‘फ्रीबी संस्कृती’चे प्रतीक असल्याचा आरोप त्यांनी केला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या धोरणाचा थेट फटका ऑटो रिक्षा चालक, कॅब चालक तसेच लघु वाहतूक व्यवसायावर अवलंबून असलेल्या कष्टकरी कामगारांना बसणार असून त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याचे डॉ. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
इंधन दरवाढ, कर्जाचे वाढते हप्ते, परवाने, विमा व दैनंदिन खर्च यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कामगार वर्गाला अशा घोषणा बेरोजगारीच्या दिशेने ढकलणाऱ्या ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर लोकांना भुरळ घालणाऱ्या अशा निर्णयांमुळे सामाजिक समतोल बिघडत असून कामगारांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्र कामगार सभा सरकार तसेच सर्व राजकीय पक्षांना आवाहन करते की, कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम करणारे असे लोकलक्ष्यी निर्णय तात्काळ थांबवावेत. तसेच कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी कामगार संघटनांशी सविस्तर चर्चा करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!