Homeपिंपरी चिंचवडहिंजवडी–वाकड परिसरात अवजड वाहनांवर कडक लगाम; वेगमर्यादा ३० किमी आणि वाहनांना कॅमेरे...

हिंजवडी–वाकड परिसरात अवजड वाहनांवर कडक लगाम; वेगमर्यादा ३० किमी आणि वाहनांना कॅमेरे बसवणे अनिवार्य

हिंजवडी / प्रतिनिधी  : दि. २६ नोव्हेंबर २०२५      हिंजवडी, वाकड, रावेत, तळवडे पुनावळे , जांबे, नेरे दत्तवाडी, कासारसाई आदी  परिसरात बांधकाम व औद्योगिक वाहतूक वाढल्याने आरएमसी ट्रक, डंपर, मिक्सर यांसारख्या अवजड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाहनांमुळे शहरात सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी, रस्त्यांची हानी आणि अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी यावर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
अवजड वाहनांवर नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबवण्याचा निर्णय २४ नोव्हेंबर च्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. पोलीस आयुक्तांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर प्रमुख मार्गांवर कॅमेरे बसवणे, वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची योजना मंजूर केली आहे.

नवीन नियमांनुसार आरएमसी ट्रक, डंपर, मिक्सर या सर्व वाहनांसाठी वेगमर्यादा ३० किमी प्रतितास इतकी आणि वाहनांना कॅमेरे बसवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जीपीएस मॉनिटरिंग तसेच स्पीड कॅमेऱ्यांच्या साहाय्याने या वाहनांवर दिवसरात्र नजर ठेवली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्वरित दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अवजड वाहनांचे साइड कॅच बंपर, सुरक्षा पट्टे, कार्यरत लाईट्स आणि वाहनांची नियमित तपासणी  हे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे आता बंधनकारक असेल. डंपर आणि मिक्सरमुळे होणारे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.
दरम्यान, आरएमसी प्लांटांना नोटीस देऊन वाहनचालकांचे प्रशिक्षण, प्रमाणित उपकरणे आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहनांच्या अनियमित हालचालींवर सतत नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी वाहतूक विभाग, महापालिका आणि संबंधित संस्थांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
शहरातील वाढती अवजड वाहतूक आणि त्यामुळे निर्माण होणारा अपघाताचा धोका कमी करण्यासाठी ही कडक अंमलबजावणी अत्यावश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नवीन उपाययोजनांमुळे वाहतूक सुरळीत राहण्यास आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!