Homeपिंपरी चिंचवडशहरी वस्त्यांमध्येही बिबट्यांचे वाढते दर्शन; हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाखांची मदत –...

शहरी वस्त्यांमध्येही बिबट्यांचे वाढते दर्शन; हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाखांची मदत – अपंगत्वास 7.5 लाखांची तरतूद

हिंजवडी / प्रतिनिधी : दि. २४ नोव्हेंबर २०२५ शहरापासून ग्रामीण भागापर्यंत बिबट्यांच्या हालचालीत मोठी वाढ झाल्याचे समोर येत आहे. पूर्वी केवळ जंगल परिसरात दिसणारा बिबट्या आता पुणे ग्रामीण, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, हिंजवडी, नेरे दत्तवाडी, कासारसाई, दारुब्रे , शिरगाव तसेच शहरातील औंध, घोरपडे पेठ यांसारख्या शहरी वस्त्यांमध्येही  दिसू लागला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
याबाबत पुणे पीसीएमसी न्यूज 24 च्या प्रतिनिधीने मुळशी वनविभाग परिक्षेत्राचे वनाधिकारी  प्रताप जगताप यांच्याशी संपर्क करून थोडी माहिती घेतली आहे वनविभागाकडील  माहितीनुसार, ‘अन्नाचा अभाव, जंगलांचे घटते क्षेत्र आणि वाढती मानवी वस्ती यामुळे बिबटे मानवी वस्त्यांकडे अधिक प्रमाणात येत आहेत. पाळीव जनावरे, मोकाट कुत्री तसेच उघड्यावर ठेवलेला कचरा ही देखील बिबट्यांना आकर्षित करणारी कारणे मानली जातात. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू किंवा गंभीर जखमी झाल्यास शासनाची मदत मिळते बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये नागरिक जखमी होण्याचे किंवा मृत्यू होण्याचे प्रकार वाढत असल्याने राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मदत धोरणाची माहिती प्रत्येक नागरिकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 1) हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाख रुपये आर्थिक मदत जर बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या वारसाला चोवीस तासाच्या आत  १० (दहा लाख) रुपयांचा धनादेश देण्यात येतो व उर्वरित 15 लाख रुपये वारसांच्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझिट करण्यात येते. ही  नुकसानभरपाई म्हणून शासनाकडून देण्यात येते. 2) कायमचे अपंगत्व आल्यास  7 लाख 50 हजार रुपये, तसेच हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आले, चालणे फिरणे किंवा दैनंदिन कामे करण्यास अडचण निर्माण झाली, तर त्याला 7 लाख 50  हजार रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध आहे. 3) इतर जखमा झाल्यास उपचार खर्चाची मदत हल्ल्यात किरकोळ किंवा मध्यम स्वरूपाच्या जखमा झाल्यास देखील उपचारासाठी शासनाकडून मदत मिळू शकते. उपचार खर्चाचा दावा संबंधित वनक्षेत्र कार्यालयात करता येतो.
नुकसानभरपाई मिळवण्यासाठी प्रक्रिया मृत व्यक्ती किंवा जखमी याबाबत पोलिस आणि वनविभागाकडून पंचनामा  उपचाराचा रिपोर्ट  मृत्यू प्रमाणपत्र अपंगत्वासाठी वैद्यकीय मंडळाचा तपशीलवार अहवाल अर्ज संबंधित वनविभागाच्या कार्यालयात सादर करणे दस्तऐवजांची पडताळणी झाल्यानंतर शासनाकडून मदत थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.

Oplus_131072

रात्री किंवा पहाटे निर्जन भागात एकटे जाणे टाळावे कचरा व अन्न उघड्यावर न टाकणे ,मोकाट कुत्र्यांना अन्न देणे टाळावे  यामुळे बिबटे त्या परिसरात आकर्षित होतात संशयास्पद हालचाल दिसल्यास लगेच 1926 वनविभाग किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावे घरांच्या परिसरात पुरेसे उजेड ठेवणे अशी माहिती प्रताप जगताप यांनी ‘पुणे पीसीएमसी न्यूज:24 ‘ ला दिली.

पुणे आणि आसपासच्या परिसरात बिबट्यांची वाढती हालचाल आता चिंतेचा विषय ठरत आहे याकरिता वनपरिक्षेत्राच्या जवळ असलेल्या सोसायट्यांनी ही काळजी घ्यावी सीमाभिंत किंवा तारेचे कुंपण तसेच सगळीकडे उजेड ठेवावे, तसेच  नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाशी समन्वय ठेवणे अत्यावश्यक आहे. संभाव्य धोका कमी करण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून जनजागृती, पिंजरे लावणे व मॉनिटरिंगचा वेग वाढविण्यात आला आहे.
शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाईची योजना ही पीडितांसाठी दिलासा देणारी आहे; मात्र सुरक्षितता आणि जागरूकता हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

( छायाचित्र – संग्रहित )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!