Homeपुणेविश्रांती हॉस्पिटलकडून बालकांच्या कर्करोगासाठी निःशुल्क उपचार योजना; गरजू कुटुंबांसाठी मोठा दिलासा

विश्रांती हॉस्पिटलकडून बालकांच्या कर्करोगासाठी निःशुल्क उपचार योजना; गरजू कुटुंबांसाठी मोठा दिलासा

पुणे : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांतील बालकांना कर्करोगासारख्या गंभीर आजारावर वेळेवर व दर्जेदार उपचार मिळावेत, या उद्देशाने भवानी पेठ येथील विश्रांती हॉस्पिटलने बालकांच्या कर्करोगासाठी विशेष निःशुल्क उपचार सहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे उपचारांच्या खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत पात्र बालरुग्णांना अनुभवी कर्करोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञांचा निःशुल्क सल्ला, आवश्यक औषधे, केमोथेरपी तसेच रेडिएशन थेरपी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. उपचारादरम्यान आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व समुपदेशनाची सुविधाही देण्यात येणार असून, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक टप्प्यावर सहकार्य केले जाणार आहे.

भारतामध्ये दरवर्षी हजारो बालकांना विविध प्रकारच्या कर्करोगाचे निदान होते. योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञ उपचार मिळाल्यास अनेक मुलांना पूर्णपणे बरे होण्याची संधी असते. मात्र उपचारांचा मोठा खर्च अनेक कुटुंबांसाठी अडथळा ठरतो. ही बाब लक्षात घेऊन विश्रांती हॉस्पिटलने हा लोकहिताचा उपक्रम सुरू केला आहे.

विश्रांती हॉस्पिटलने यापूर्वीही महिलांसाठी स्तनाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील निःशुल्क उपचार योजना राबवून अनेक रुग्णांना दिलासा दिला आहे. आता या सेवांचा विस्तार करत बालकांच्या कर्करोग उपचारांचाही समावेश करण्यात आला आहे.

संस्थापक विश्वस्त कर्नल एन. एस. न्यायपती यांनी राज्यातील बालरोगतज्ज्ञ, कर्करोगतज्ज्ञ, कौटुंबिक डॉक्टर, शासकीय व खासगी रुग्णालये, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल बालकर्करोग रुग्णांची माहिती या योजनेपर्यंत पोहोचवून गरजू कुटुंबांना उपचारांचा लाभ मिळवून द्यावा.

तसेच, कर्करोगग्रस्त बालकांच्या पालकांनी आणि नागरिकांनीही या योजनेची माहिती अधिकाधिक गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवून जनजागृतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.

संपर्क :
विश्रांती हॉस्पिटल, भवानी पेठ, पुणे
📞 77700 08249 / 73500 10595

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!