पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
आजपासून प्रायोगिक तत्वावर वाहतुकीत बदल
हिंजवडी / प्रतिनिधी
हिंजवडी वाकड परिसरातील प्रचंड वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून वाहतूक विभागाने आजपासून नव्याने वाहतूकीत बदल केला आहे. हे बदल प्रायोगिक तत्त्वावर असून पुढील काही दिवसांत याचा परिणाम पाहून निर्णय घेतला जाणार आहे.
मुख्य बदलांमध्ये वाकड–हिंजवडी पूल एकेरी (One-Way) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळी ८ ते १२ दरम्यान पुलावरील वाहतूक मुख्यत्वे वाकड → हिंजवडी दिशेने तीन मार्गिकांतून सोडली जाणार असून उलट दिशेसाठी केवळ एक मार्गिका ठेवली जाईल.
संध्याकाळी ४ ते १० दरम्यान व्यवस्था उलट केली जाईल.
याशिवाय मुंबई–बंगळूर महामार्गावरील प्रवेश व निर्गमन ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी फक्त प्रवेश तर काही ठिकाणी फक्त बाहेर पडण्याची परवानगी राहील.
तसेच गर्दीच्या वेळेत ( peak hours ) दुचाकी वाहनांना पुलावर बंदी घालण्यात आली आहे. दुचाकींना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी यांनी नागरिकांना सूचना पाळण्याचे आवाहन केले असून बदलांविषयी अभिप्राय महत्त्वाचा ठरणार आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















