पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
पुणे / हरीश शर्मा :
छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या मतदारसंघात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विकासकामे, सामाजिक उपक्रम तसेच जनतेशी ( जनता दरबार ) थेट संवाद साधून समस्यांचे निराकरण करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
स्थानिक पातळीवर रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा , आरोग्य सुविधा महात्मा फुले , पंतप्रधान जन आरोग्य सुविधा सांस्कृतिक उपक्रम यांसारख्या अनेक क्षेत्रात त्यांनी प्रभावी प्रयत्न केले आहेत. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिला व वयोवृद्धांसाठी कल्याणकारी योजना पोहोचवणे तसेच पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेणे ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी ठरली आहे.
सिद्धार्थ शिरोळे हे शांत, सयमी आणि सर्वांना आपुलकीने जोडून घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. कोणत्याही नागरिकाची समस्या असो ती छोटी असो वा मोठी त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. “लोकप्रतिनिधी हा जनतेच्या घराचा एक सदस्य आहे” अशी त्यांची भूमिका असून त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याबद्दल आत्मीयतेची भावना आहे.
राजकारणातील पुढची पिढी म्हणून सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्या प्रामाणिक कार्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. युवकांमध्ये सकारात्मकता आणि नवचैतन्य जागविणे, तर ज्येष्ठ नागरिकांशी आपुलकीचे नाते राखणे या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी यश मिळवले आहे.
त्यांच्या कार्यकौशल्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघात विकासाची नवी दारे उघडली असून नागरिकांमध्ये विश्वास व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. खऱ्या अर्थाने ‘जनतेसाठी सदैव तत्पर लोकप्रतिनिधी’ अशी त्यांची छाप आज दृढ झाली आहे.

आमदार सिद्धार्थ शिरोळे : लोकसेवेची नवी दिशा
शिवाजीनगर मतदारसंघात
उल्लेखनीय कामगिरी :
* विकासासाठी सातत्याने पाठपुरावा
* पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा
* शैक्षणिक उपक्रमांना चालना, शाळा व महाविद्यालयांसाठी सुविधा
युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे
* पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण व हरित उपक्रम
*ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी
* स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये :
शांत आणि सयमी नेतृत्व
कोणत्याही नागरिकाच्या मदतीसाठी नेहमी तत्पर
संवादकुशल व सर्वांना आपुलकीने जोडून घेणारे
युवकांमध्ये उत्साह व सकारात्मक विचार जागविणारे
आजच्या काळात राजकारणाकडे अनेकदा वेगळ्या नजरेने पाहिले जाते, मात्र सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्या प्रामाणिक कार्यशैलीतून “राजकारण म्हणजे लोकसेवा” ही मूल्ये जपली आहेत.
शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्याकडून अपेक्षित असलेले विकासकार्य प्रत्यक्षात अनुभवायला मिळत असल्याने त्यांच्याबद्दल समाधान आणि आत्मीयतेची भावना आहे.
खऱ्या अर्थाने सिद्धार्थ शिरोळे हे “जनतेचे आमदार” म्हणून ओळखले जातात – जे नेहमी लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात आणि विकासाच्या दिशेने नवे मार्ग दाखवतात.


मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















