Homeपुणेब्रह्माकुमारी सुनंदा दीदी यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरव

ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरव

पुणे / प्रतिनिधी : दि. १४ डिसेंबर २०२५ :
ऊर्जा संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि आदर्शवत कार्य केल्याबद्दल ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी, संचालिका, ब्रह्माकुमारीज जगदंबा भवन, पुणे यांना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनानिमित्त भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण भारतातून “ऊर्जा संरक्षणासाठी सर्वोत्तम निवासी युनिट” या प्रतिष्ठित श्रेणीत पुण्यातील जगदंबा भवनची निवड करण्यात आली आहे.

ऊर्जा संरक्षण क्षेत्रात पुण्याच्या जगदंबा भवनचा राष्ट्रीय सन्मान                                                ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाययोजना, ऊर्जेचा किफायतशीर व विवेकपूर्ण वापर, नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा प्रभावी अवलंब, तसेच पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे उपक्रम यामुळे जगदंबा भवनची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल घेण्यात आली. ऊर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी आखलेली नियोजनबद्ध यंत्रणा आणि सर्व निवासी सदस्यांचा सक्रिय सहभाग हे या यशाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
जगदंबा भवन परिसरात वीज बचतीसाठी सौरऊर्जा प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत असून ऊर्जा कार्यक्षम उपकरणांची अंमलबजावणी, नैसर्गिक प्रकाश व वायुवीजनाचा अधिकाधिक उपयोग तसेच ऊर्जा संवर्धनाबाबत नियमित जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. या सर्व उपक्रमांमुळे ऊर्जा बचतीसह कार्बन उत्सर्जनातही लक्षणीय घट साध्य करण्यात यश आले आहे.

या राष्ट्रपती पुरस्कारामुळे ब्रह्माकुमारीज संस्थेच्या ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीविषयीच्या दूरदृष्टीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजात ऊर्जा बचतीबाबत जनजागृती निर्माण करण्याचे कार्य सातत्याने सुरू असून अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून शाश्वत विकासाचा प्रभावी संदेश दिला जात आहे.
हा सन्मान केवळ एका संस्थेपुरता मर्यादित नसून देशभरातील निवासी संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांसाठी ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी आदर्श ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!