Homeपुणेप्रभाग ८ औंध–बोपोडीमध्ये ‘शांत प्रचार’च ठरतोय प्रभावी शस्त्र; ज्योती नागेश परदेशींचा जनसंपर्क...

प्रभाग ८ औंध–बोपोडीमध्ये ‘शांत प्रचार’च ठरतोय प्रभावी शस्त्र; ज्योती नागेश परदेशींचा जनसंपर्क निर्णायक टप्प्यात

बोपोडी | प्रतिनिधी : दि. १२ जानेवारी
पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिथे मोठमोठ्या सभा, शक्तिप्रदर्शन, बॅनरबाजी आणि घोषणा सुरू आहेत, तिथे प्रभाग क्रमांक 8 औंध–बोपोडीमध्ये अपक्ष उमेदवार ज्योती नागेश परदेशी यांनी मात्र प्रचाराची वेगळीच दिशा घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कोणताही गाजावाजा न करता, शांततेत पण ठामपणे त्या घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत आणि हाच प्रचार सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे.

Oplus_131072
Oplus_131072

औंध–बोपोडीतील आंबेडकर चौक, बोपोडी गावठाण, डी.पी. रोड परिसरात ज्योती परदेशी यांचा प्रचार दौरा सातत्याने सुरू आहे. सोसायट्यांमध्ये कोणतेही प्रदर्शन न करता गुप्त बैठकांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न ऐकून घेणे, प्रभागातील अपूर्ण विकासकामांवर थेट चर्चा करणे आणि पुढील पाच वर्षांचा स्पष्ट आराखडा मांडणे, ही त्यांची प्रचार पद्धत मतदारांना भावताना दिसत आहे.
राजकारणातील ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या ज्योती परदेशी या केवळ आश्वासनांवर नव्हे तर अनुभव, संपर्क आणि कामाच्या शिस्तीवर मत मागताना दिसत आहेत. प्रभागातील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात त्या स्वतः उपस्थित राहून मतदारांना विकासाचे मुद्दे पटवून देत असल्याचे चित्र आहे. हीच गोष्ट इतर उमेदवारांपेक्षा त्यांना वेगळी ठरवत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी महिला मतदारांनी ज्योती परदेशी यांचे औक्षण करत “आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” असा ठाम संदेश दिला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्गाकडून मिळणारा हा प्रतिसाद सत्ताकेंद्रांना अस्वस्थ करणारा ठरत असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात.
प्रभागात सर्वच पक्ष आपली ताकद दाखवण्यात गुंतलेले असताना, ज्योती परदेशी या मात्र शांततेत पण ठोस पायाभूत जनाधार उभा करत असल्याचे दिसून येत आहे. मतांची खरी लढाई मैदानावर नव्हे, तर घराघरांत लढली जाते, हे त्यांच्या प्रचारातून अधोरेखित होत आहे.
ज्योती नागेश परदेशी या अपक्ष उमेदवार असून त्यांचे निवडणूक चिन्ह ‘रोड रोलर’ आहे. बाह्य गाजावाज्याऐवजी जनतेशी थेट संवाद आणि अनुभवाच्या बळावर उभी राहिलेली ही उमेदवारी प्रभाग 8 मधील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!