Homeपुणेपुण्यात १० वर्षांच्या मुलीच्या स्वादुपिंडातील दुर्मिळ गाठ यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढली; बाणेरमधील मणिपाल...

पुण्यात १० वर्षांच्या मुलीच्या स्वादुपिंडातील दुर्मिळ गाठ यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढली; बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलची कामगिरी

कराटे सरावादरम्यान झालेल्या दुखापतीतून आजार उघड; भारतातील सर्वात कमी स्वादुपिंड ( एसपीएन ) प्रकरणातील एक

पुणे | प्रतिनिधी : दि. १४ मार्च २०२६
पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी १० वर्षांच्या मुलीच्या स्वादुपिंडातील अत्यंत दुर्मिळ गाठ यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढून तिचे प्राण वाचवले. भारतात नोंद झालेल्या सॉलिड स्यूडोपापिलरी निओप्लाझम (एसपीएन ) या आजाराच्या सर्वात कमी वयातील प्रकरणांपैकी हे एक मानले जात आहे.
ही मुलगी कराटे सरावादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांना स्वादुपिंडामध्ये दुर्मिळ गाठ असल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करून गाठ पूर्णपणे काढून टाकली.

तज्ञांच्या माहितीनुसार सॉलिड स्यूडोपापिलरी निओप्लाझम (एसपीएन ) हा स्वादुपिंडाचा अतिशय दुर्मिळ ट्युमर आहे. हा आजार साधारणपणे किशोरवयीन किंवा तरुण महिलांमध्ये आढळतो आणि अनेकदा शरीरात कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे अशा आजाराचे निदान होणे अत्यंत कठीण असते.
शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमित पारसनीस यांनी सांगितले की, स्वादुपिंडाची रचना लक्षात घेऊन अत्यंत नाजूक शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी लहान आतड्याचा काही भाग आणि स्वादुपिंडाचा प्रभावित भाग सुरक्षितपणे काढण्यात आला. लहान मुलांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत रक्तस्राव होण्याचा धोका जास्त असतो, मात्र डॉक्टरांच्या टीमने अत्यंत कमी रक्तस्रावात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.
सध्या मुलगी पूर्णपणे बरी असून ती पुन्हा शाळेत जाऊ लागली आहे आणि नियमित जीवन जगत आहे. डॉक्टरांनी सांगितले की, अशा दुर्मिळ आजारांमध्ये वेळेवर तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
मणिपाल हॉस्पिटलचे क्लस्टर डायरेक्टर आनंद मोटे यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या टीममुळे अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणे शक्य होत आहे.
या शस्त्रक्रियेसाठी सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे डॉ. अमित पारसनीस, अ‍ॅनेस्थेसियोलॉजिस्ट डॉ.आशिष पाठक, तसेच पेडियाट्रिक एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ.पूजा गिरे आणि त्यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!