Homeमहाराष्ट्रपरिवहन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात एकदिवसीय बंद — राज्यभरातील चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! प्रधानमंत्री यांच्या...

परिवहन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात एकदिवसीय बंद — राज्यभरातील चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! प्रधानमंत्री यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान आंदोलनाने घेतले जोरदार वळण

https://youtu.be/w-fh-ub3sqo?si=TnEORzCridYT0n65

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Liv

हरीश शर्मा -मुख्य संपादक

मुंबई | पुणे दि. ९ ऑक्टोबर
राज्यातील कॅब, टॅक्सी व रिक्षा चालकांनी परिवहन विभागाच्या भ्रष्टाचाराविरोधात आणि त्यांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी आज (९ ऑक्टोबर) एकदिवसीय बंद पुकारला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान चालकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा बंद आयोजित करण्यात आला होता.
राज्यभर या बंदला चालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहाटेपासूनच सुमारे ९०% पेक्षा अधिक कॅब चालकांनी आपली वाहने बंद ठेवली, तर अनेक ठिकाणी रिक्षा चालकांनीही या आंदोलनाला सक्रिय साथ दिली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा प्रमुख शहरांमध्ये वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
विमानतळांवर गोंधळ:
मुंबई आणि पुणे विमानतळावर बंदचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. अनेक प्रवासी वाहनांच्या अभावामुळे विमानतळ परिसरात अडकून पडले. विशेषतः IT क्षेत्रातील कर्मचारी व कॉर्पोरेट प्रवासी वर्गाला याचा मोठा फटका बसला. दुसरीकडे, बंदमुळे लोकल ट्रेन व बस प्रवाशांची संख्या वाढल्याचे चित्र दिसून आले.
चालकांचे आर्थिक नुकसान:
या बंददरम्यान चालकांचे अंदाजे २ ते ३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील, कुठलाही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले, हे विशेष लक्षवेधी ठरले.
मुख्य मागण्या:
परिवहन विभागाने निश्चित केलेले दर ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या अॅप्सवर लागू करावेत.
बाईक टॅक्सी त्वरित बंद कराव्यात.
चालकांच्या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी.
🔹 आझाद मैदानात मागील तीन महिन्यांपासून भारतीय गिग कामगार मंचाचे आंदोलन सुरू असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने चालकांचा रोष अधिक तीव्र झाला आहे. संघटनेच्या नेत्यांनी इशारा दिला आहे की, शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र स्वरूप घेईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!