
पुणे पीसीएमसी न्यूज 24:
पुणे / प्रतिनिधी
ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्या अफाट परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून राज्यातील रिक्षा कॅब चालकांचे आर्थिक मानसिक शोषण करत असून त्या विरोधात भारतीय कामगार सेना अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी राज्यव्यापी आंदोलन करून आमरण उपोषणास बसले होते त्याविरोधात उच्च न्यायालयाने आंदोलन स्थगित करण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
याच विषयावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी नुकतीच मंत्रालयात एक बैठक घेतली व ई बाईक व टॅक्सी आणून बँकेच्या अर्थसहयाने नवीन पाच हजार वाहने रस्त्यावर आणण्याचा मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखवले असे डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तसेच
“राज्य सरकार पुन्हा एकदा खाजगी ऍप च्या माध्यमातून या व्यवसायात पदार्पण करण्याचा प्रयत्न करीत आहे यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आम्ही तीव्र निषेध करत असून लवकरच पुन्हा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही कॅब रिक्षा चालक संघटना ,महाराष्ट कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिला आहे.”

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














