पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
खडकीत मुख्य पुणे मुंबई रस्त्यावर बेकायदेशीर फळविक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणात वावर
खडकी / प्रतिनिधी
स्मार्ट सिटी अंतर्गत पुणे शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते रुंदीकरण , पदपथ, वृक्षारोपण विद्युत रोषणाई इत्यादी कामे सुरू आहेत नुकताच खडकी मेट्रो स्टेशन पुणेकरांसाठी खुला करण्यात आला असून जुना पुणे मुंबई मार्ग प्रशस्त सहा पदरी झाला आहे. मात्र या रस्त्यावर अनधिकृत बेकायदेशीर फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून पदपथ तसेच मुख्य रस्त्यावर ही यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे दिवसागणिक अपघातांची संख्या वाढतच आहे याकडे स्थानिक प्रशासन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच खडकी पोलीस ठाणे यांचे दुर्लक्ष होत आहे . पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभाग मार्फत नावापुरती कारवाई दाखवली जात आहे . अतिक्रमण अधिकाऱ्यांसमोर च बिनदिक्कतपणे फळविक्रेते व्यवसाय करत असतात फक्त नावापुरते एक दोन जणांवर थोडेसे सामान उचलून कारवाई दाखवण्यात येते. अतिक्रमण गाडी गेल्यावर पुन्हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू त्यामुळे अतिक्रमण विभागाकडे नागरिक शंका करीत आहे.
रस्त्यावर च पूर्ण पदपथावर टेम्पो लावून त्यापुढे टेबल ठेऊन फळविक्रीची बेकायदेशीर जणू दुकाने च सुरू
या बेकायदेशीर फळविक्रेत्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे याठिकाणी अनेक वेळा या फळविक्रेत्यांमध्ये भांडण होत असून वाहनचालक व येथील नागरिकाना याचा त्रास होत आहे महामार्गावर नो हॉकर्स झोन असताना ही हे विक्रेते याठिकाणी वयवसाय करतातच कसे ? स्थनिक पोलीस प्रशासन काय करत आहे ? पुणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग काय करत आहे ? असा सवाल येथून प्रवास करणारे वाहनचालक व नागरिक करीत आहे.
_ खडकी पोलीस ठाण्यामार्फत पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वाकडेवाडी ते बोपोडी रस्त्यावर फळविक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासदर्भात पुणे महापालिकेला पत्र दिले आहे. त्यांनी वेळोवेळी याठिकाणी कारवाई करून रस्ते वाहंनचालकांसाठी मोकळे करून घ्यावे.
– विक्रमसिंग कदम – वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,खडकी पोलीस ठाणे

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















