Homeपिंपरी चिंचवडऑनलाइन कॅब कंपन्यांच्या धोरणांमुळे प्रवासी-चालक वाद वाढले; पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

ऑनलाइन कॅब कंपन्यांच्या धोरणांमुळे प्रवासी-चालक वाद वाढले; पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

पुणे / पिंपरी-चिंचवड | दि. २ एप्रिल २०२६
ऑनलाइन कॅब अॅग्रीगेटर कंपन्यांच्या दिशाभूल करणाऱ्या आणि विरोधाभासी कार्यपद्धतीमुळे प्रवासी आणि कॅब/रिक्षा चालक यांच्यातील वाद वाढत असल्याचा गंभीर आरोप आज आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी संबंधितांनी विविध अधिकृत कागदपत्रे, शासन आदेश आणि कंपन्यांचे युजर अॅग्रीमेंट्स पत्रकारांसमोर सादर करत वस्तुस्थिती स्पष्ट केली.
सादर करण्यात आलेल्या Annexure मधील दस्तऐवजांच्या आधारे, सध्या निर्माण होणाऱ्या वादांचे मूळ कारण या कंपन्यांची कार्यपद्धती असल्याचे स्पष्ट होत असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
Annexure मधील पहिल्या पानावर राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाचे पत्र असून, त्यामध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेले दरच रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच दुसऱ्या Annexure मध्ये पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा ठराव सादर करण्यात आला. या ठरावानुसार, १ जानेवारी २०२४ पासून वातानुकूलित (AC) टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर २५ रुपये, तर नॉन-एसी टॅक्सींसाठी २१ रुपये दर लागू करण्यात आले आहेत.

मात्र, प्रत्यक्षात अनेक ऑनलाइन कॅब कंपन्या या अधिकृत दरांपेक्षा वेगळे दर आकारत असल्याने प्रवासी आणि चालक यांच्यात गैरसमज निर्माण होत असून त्यातून वाद उद्भवत आहेत.
पत्रकार परिषदेत संबंधितांनी प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ऑनलाइन कॅब कंपन्यांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच स्पष्ट आणि एकसमान दर धोरण लागू करण्याची मागणी केली.
या प्रकरणामुळे शहरी भागातील प्रवासी सेवा व्यवस्थेवर परिणाम होत असून, यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!