खडकी | प्रतिनिधी : दि. 16 जून 2026
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस (रजि.) या राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनेच्या महाराष्ट्र सचिवपदी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर उर्फ बबलू अशोक पोलकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने 7 जून 2026 रोजी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
संघटनेने जारी केलेल्या नियुक्तीपत्रात प्रभाकर पोलकम यांच्या समाजातील जुझारू कार्यशैली, संघटनेप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र राज्यातील कटक मंडळे व कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रासाठी महाराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या नियुक्तीद्वारे राज्यभरातील सफाई कामगारांच्या प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. संघटनेच्या संविधान व नियमांचे पालन करत संघटनेच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
प्रभाकर (बबलू) पोलकम यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, कामगार व स्थानिक स्तरावरील संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, सफाई कामगारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी त्यांच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
छायाचित्र: अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस (रजि.) तर्फे प्रभाकर उर्फ बबलू अशोक पोलकम यांना महाराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏



















