पुणे | हरीश शर्मा – पुणे पीसीएमसी न्यूज 24 न्यूज नेटवर्क पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉन्ड फाउंडेशन (नोंदणीकृत ना-नफा संस्था) ने आपल्या कार्याचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . ४ एप्रिल २०२६ रोजी कपिल मल्हार कम्युनिटी हॉल येथे आयोजित सोहळ्यात संस्थेच्या वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्या ग्रुप बस्तीतील मुलांनी विशेष मुलांसह सादर केलेल्या भावपूर्ण देवी वंदनाने झाली. त्यानंतर संस्थापकांनी “इयर गॉन बाय” सादरीकरणातून मागील वर्षातील उपक्रम आणि भविष्यातील योजनांची सविस्तर माहिती दिली.
अल्प कालावधीतच फाउंडेशनने विविध शाळा, बस्ती आणि गावांमध्ये 100 हून अधिक प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. यामध्ये पंचकोष, पडद्याचे व्यसन (स्क्रीन अॅडिक्शन), लैंगिक समानता, गुड टच-बॅड टच यांसारख्या संवेदनशील विषयांवर जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात आले.
याशिवाय, बाणेर परिसरात वस्तीतील मुलांसाठी साप्ताहिक वर्ग आणि ग्रंथालय सुरू करून व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण, व्यसनमुक्ती आणि जीवन कौशल्ये यांचे मार्गदर्शन दिले जात आहे, ज्यामुळे ही मुले भविष्यासाठी सक्षम बनत आहेत.
संस्थापक शोभा श्रीकांत, वर्षा काळे, सुधा भट आणि निपा जोग यांनी अल्पावधीत ही यशस्वी कामगिरी साध्य करण्यासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.
एकूणच, ‘पालवी’ फाउंडेशनने केवळ एक वर्षात समाजातील वंचित घटकांसाठी प्रभावी आणि प्रेरणादायी कार्य उभे करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















