Homeक्राईम४ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ची...

४ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ची कारवाई

पुणे | प्रतिनिधी : दि. २६ फेब्रुवारी २०२६
चोरीच्या गुन्ह्यात मागील चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ ने अटक केली आहे. संबंधित आरोपी हा पुणे शहर पोलीस अंतर्गत वानवडी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात निष्पन्न व पाहिजे होता.

दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस शिपाई खरात यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वानवडी पोलीस स्टेशन गु.र. नं. २८/२०२२ भा.दं.वि. कलम ३८१ मधील पाहिजे आरोपी युवराज जगन्नाथ चव्हाण (वय ३५, रा. ढोरे वस्ती, केसनंद, वाघोली, पुणे) हा संबंधित परिसरात थांबलेला आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीस वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस. उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस हवालदार नितीन मुंढे, सुजित वाघमारे, परीट व पोलीस अंमलदार खरात यांनी सहभाग घेतला.
चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात यश आल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!