Homeपुणे२५ वर्षांची एकनिष्ठता बाजूला! काँग्रेसने डावलले, ज्योती परदेशी प्रभाग ८ मधून अपक्ष...

२५ वर्षांची एकनिष्ठता बाजूला! काँग्रेसने डावलले, ज्योती परदेशी प्रभाग ८ मधून अपक्ष मैदानात

बोपोडी | प्रतिनिधी : दि. १ जानेवारी २०२६          पुणे  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षासाठी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ज्योती परदेशी यांनी ( प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी) मधून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्योती परदेशी यांनी अनेक वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले आहे. पक्षाच्या सभा, बैठका, मेळावे, महिला मेळावे तसेच विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्या सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत. यावेळी प्रभाग क्रमांक ८ मधून काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, अशी आशा बाळगून त्यांनी कार्य सुरू ठेवले होते.

स्थानिक उमेदवार डावलला, आयात उमेदवार पुढे! ज्योती परदेशींचा काँग्रेसला थेट इशारा
मात्र, बोपोडी परिसरात काँग्रेस पक्षाने बाहेरून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त करत ज्योती परदेशी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक असून तो जनतेच्या पाठिंब्यावर आधारित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बोपोडी परिसरातील स्थानिक रहिवासी असल्यामुळे ज्योती परदेशी यांचा जनसंपर्क मजबूत असल्याचे मानले जाते. त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये ही निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप व राष्ट्रवादीकडून जोरदार हालचाली सुरू असतानाच, काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार म्हणून ज्योती परदेशी यांच्याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील निवडणूक निकालात अनपेक्षित घडामोडी घडू शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सारसबाग बंद निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनचा आक्षेप, प्रशासनाने फेरविचार करावा अशी मागणी

“सुरक्षेच्या कारणांचा आधार घेत विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचा संशय” — डॉ. फरहा शेख यांचे निवेदन बोपोडी | प्रतिनिधी : दी. 27 मे 2026 बकरी ईदनंतर पारंपरिक...

खडकी छावणीतील हातगाडी परवाना धारकांना मुदतवाढ द्या, सारथी सोशल फाउंडेशनची मागणी

कागदपत्रे अपूर्ण राहिल्याने अनेक हातगाडी व्यावसायिक अडचणीत; खडकी छावणी परिषदेला निवेदन सादर खडकी | प्रतिनिधी : दी. 26 मे 2026           ...

पीसीएमसीचा अतिक्रमणधारकांना इशारा; १५ दिवसांत पदपथ मोकळे करा, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांच्या सुरक्षित व विनाअडथळा प्रवासासाठी महापालिकेची मोहीम तीव्र; क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईचा आढावा पिंपरी | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026           ...

पुण्यात मुस्लिम समाजाची गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी

सामाजिक सलोखा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुणे | प्रतिनिधी : दि. 26 मे 2026               ...

पुणे शहर काँग्रेसच्या नवनिर्वाचित शहराध्यक्षांचा जनहित जागृती मंचतर्फे सत्कार

डॉ. विश्वजीत कदम यांना शॉल व संविधान पुस्तक भेट देत मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव बोपोडी | प्रतिनिधी : दि. 23 मे 2026         ...

error: Content is protected !!