Homeपुणेपुणे महापालिका 2026: उमेदवार आयातीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता, मतदार संभ्रमात

पुणे महापालिका 2026: उमेदवार आयातीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता, मतदार संभ्रमात

हरीश शर्मा  | मुख्य संपादक 9822220090
आगामी पुणे महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. विविध पक्षांमधून आलेल्या उमेदवारांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यामुळे वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलल्याने हे कार्यकर्ते आगामी निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेणार, ते पक्षासाठी सक्रियपणे काम करतील का, आयात उमेदवारांचा प्रचार करतील का, की अलिप्त भूमिका घेतील, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याचा थेट परिणाम निवडणूक प्रचारावर आणि मतांच्या गणितावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उमेदवारांच्या सततच्या पक्षबदलामुळे मतदारांमध्येही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक वर्षे भाजपशी ओळख असलेले काही उमेदवार अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत, तर राष्ट्रवादीतील उमेदवार भाजपमध्ये दाखल होत आहेत. काही ठिकाणी काँग्रेसमधील नेते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे “कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे” हेच मतदारांना ओळखणे कठीण झाले आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत पक्षनिष्ठेपेक्षा निवडणूक लढवणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे दिसून येत असून, यामुळे पारंपरिक राजकीय मूल्ये आणि निष्ठा दुय्यम ठरत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप आगामी निवडणुकीत कोणती रणनिती अवलंबणार, नाराज कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करणार, तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस नवीन उमेदवारांच्या जोरावर कितपत यश मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकूणच, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे पुणे महापालिका निवडणूक 2026 अत्यंत चुरशीची आणि रंगतदार ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
— पुणे पीसीएमसी न्यूज 24.Live

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!