खडकी / प्रतिनिधी : दि. २५ नोव्हेंबर २०२५ खडकी बाजार परिसरातील राहुल अवचिते नामक एका नागरिकाने पोलिसांकडून गैरवर्तन, धमकी आणि जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप करीत औपचारिक तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीने लिहिलेल्या निवेदनानुसार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री पोलिसांनी त्याला विनाकारण अडवून मारहाण करत चुकीच्या पद्धतीने वागणूक दिल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तो कामावरून घरी परतत असताना दोन बिट मार्शल पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवून चौकशी केली. त्यावेळी त्यांना योग्य स्पष्टीकरण दिल्यानंतरही पोलिसांनी गैरशब्द वापरल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याचा मोबाईल फोन जप्त करून तो परत देण्यास विलंब झाल्याचेही म्हटले आहे.
निवेदनात असेही राहुल अवचिते यांनी असे ही नमूद केले आहे की, तक्रारदाराने मदतीसाठी 112 वर कॉल करतो असे सांगितल्यावर ‘तुला कुठे कॉल करायचे तिथे कर ‘ असे पोलिसांनी सांगितले त्यानंतरही परिस्थिती बिघडत गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढील दिवशी त्याच्या परिचितांच्या मदतीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात जावे लागल्याचेही पत्रात नमूद आहे.
तक्रारदाराने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी खडकीतील सामाजिक कार्यकर्ते बबलू पोलकम, भरतसिंग ठाकूर, अभिजित गडांकुश, यांनी खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली त्यानंतर पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी घडलेल्या प्रकारची कायदेशीर चौकशी करून योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले.
या प्रकरणाबत आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने संबंधित विभागाकडून अंतर्गत चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















