पुणे / प्रतिनिधी : दि. 6 नोव्हेंबर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे क्रीडा विभाग आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय (स्वायत्त), खडकी यांच्या क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हॉकी स्टेडियम येथे अंतर विभागीय हॉकी स्पर्धा (मुले-मुली) आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल बोलताना म्हणाले की, “खेळामध्ये खेळाडूंनी सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सातत्याने केलेले प्रयत्न हे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवून देतात.”
या स्पर्धेसाठी पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले असल्याची माहिती क्रीडा संचालक डॉ. महेश बेंडभर यांनी दिली.
कार्यक्रमाला खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संचालक रमेश अवस्थे, काशिनाथ देवधर, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक सुदाम शेळके, महाराष्ट्र हॉकी फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. मनोज भोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य रमेश गायकवाड, तसेच पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव अमेय काळे आणि सदस्य दिनेश कराड हे मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश कोल्हे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुदाम शेळके यांनी मानले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















