खडकी / प्रतिनिधी : दि. ३० ऑक्टोबर
खडकी छावणी परिषदेच्या वतीने महर्षी वाल्मिकी ग्रंथालय, खडकी येथे जगतगुरु रामायण रचयिता महर्षी वाल्मिकी यांच्या प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया, तसेच जॉईंट सीईओ आणि बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास वाल्मिकी समाज संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजेश काकडे, बाल्मीक समाज (ब्रि) पंचायत खडकी अध्यक्ष कैलास बिडलान, दयाराम सिरसे, अमर गोडाले, ज्येष्ठ साहित्यिक विजय जाधव, अनिल जाधव, आनंद खैराळे, संत काशिनाथ सिरसे महाराज, मनोज खैराळे, गुलाब चव्हाण, रामू बिडलान, राजेश सारवान, नरेश चनाल, कवरचंद घागट, नारायण पवार, सुदर्शन चव्हाण, देवेंद्र बिडलान, लालाजी देडूंदा, किरण आठवाल, मुकेश चव्हाण, रणजीत आठवल, धनराज जावा, विजय बेद, रोहित भेनवाल, चेतन सिरसे, करण चव्हाण, अमर लखन, अजय साळुंखे यांसह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मीनाक्षी लोहिया यांनी सांगितले की,
“ग्रंथालयात सुरू असलेले सर्व शैक्षणिक (स्किल डेव्हलपमेंट) कोर्सेस हे उपलब्ध आहेत. सर्व सफाई कर्मचारी बांधवांनी व त्यांच्या मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा.”
यानंतर ज्येष्ठ साहित्यिक विजय जाधव यांनी जगद्गुरु महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत समाजातील पालकांना संदेश दिला की,
“आपल्या लेकरांना चांगले शिक्षण द्या, जेणेकरून ते डॉक्टर, इंजिनिअर, वकील होऊन समाजाचा सन्मान वाढवतील.”
कार्यक्रमाच्या शेवटी राजेश कमलदास काकडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत समाजाच्या प्रगतीसाठी “शिक्षण हाच सर्वोत्तम मार्ग आहे” असे प्रतिपादन केले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














