Homeपुणेबेताल वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा —...

बेताल वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा — अंजुम इनामदार

दाऊद इब्राहिमच्या समर्थनावर तीव्र प्रतिक्रिया; “न्याय आणि कायदा सर्वांसाठी समान असावा” — मूलनिवासी मुस्लिम मंचाची मागणी
पुणे / प्रतिनिधी: दि. ३० ऑक्टोबर
अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी दिलेल्या “दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही” या वक्तव्यावरून वादंग पेटला आहे. या वक्तव्याचा देशाच्या सुरक्षेला, न्यायव्यवस्थेला आणि शहीदांच्या बलिदानाला अपमानकारक म्हणून निषेध व्यक्त करत, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी ममता कुलकर्णी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
इनामदार म्हणाले, “एका बाजूला पुण्यात शनिवार वाडा येथे मेघा कुलकर्णी यांनी फक्त नमाज पठण केले म्हणून आंदोलन उभे केले गेले, आणि दुसऱ्या बाजूला दहशतवाद्याच्या समर्थनात बोलणाऱ्यांविरुद्ध कुठलीच कारवाई होत नाही — हा समाजातील दुहेरी निकष दाखवतो.”
ते पुढे म्हणाले, “अल्पसंख्याक समाजाच्या श्रद्धा, प्रार्थना यावर टीका केली जाते, पण दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांविषयी शांतता पाळली जाते. हा अन्याय आहे. जर ममता कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर कारवाई होत नसेल, तर न्याय आणि कायदा फक्त काही लोकांसाठीच आहे का?”
मूलनिवासी मुस्लिम मंचाने या प्रकरणावर तीव्र निषेध नोंदवला असून खालील मागण्या केल्या आहेत —
दहशतवाद्याच्या समर्थनात वक्तव्य करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी.
समाजात भेदभाव निर्माण करणाऱ्या राजकीय नेत्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी.
“न्याय आणि कायदा सर्वांसाठी समान असावा” — हा संदेश देशभर जावा.
इनामदार यांनी शेवटी सांगितले की, “देश, धर्म आणि न्याय यापेक्षा वर कुणाचाही स्वार्थ नसावा. समाजात प्रेम, एकता आणि परस्पर आदर राखण्यासाठी ही आमची लढाई आहे.”

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!