Homeपिंपरी चिंचवडबोपखेल येथील कुंदन बिल्डरच्या टोलेजंग बांधकामावर बबलू पोलकम यांचा आक्षेप. देशाच्या सुरक्षा...

बोपखेल येथील कुंदन बिल्डरच्या टोलेजंग बांधकामावर बबलू पोलकम यांचा आक्षेप. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी खेळ होत असल्याचा आरोप.

हरीश शर्मा – मुख्य संपादक :  पुणे : दि. 1 नोव्हेंबर  2025

बोपखेल  परिसरात सुरू असलेल्या कुंदन बिल्डरच्या 17 मजली  बांधकामावरून देशाला धोका होऊ शकतो कारण या बांधकामाच्या चार ही बाजूला लष्करी महत्वाची आस्थापने आहेत शेजारीच गोळा बारुद फॅक्टरी आहे असे असतानाही या बांधकामाला महापालिकेने परवानगी कशी दिली ? या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर ऊर्फ बबलू  पोलकम यांनी स्टेशन हेडक्वार्टर खडकी /औंध यांना लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
पोलकम यांनी पुणे पीसीएमसी न्यूज 24 शी बोलताना सांगितले की काही वर्षांपूर्वी खडकीतील शेवाळे टॉवर येथून दहशतवाद्याने गोळा बारुद फॅक्टरी मधील छायाचित्रण करून शत्रूदेशाला  पाठवले होते तसेच या बिल्डर चे ज्याठिकाणी बांधकाम सुरू आहे त्याच्या चारही बाजूला महत्वाची लष्करी आस्थापने गोळा बारुद फॅक्टरी, सीएमई, स्टेशन हेडक्वार्टर, कॅन्टोनमेंट बोर्ड, डीईओ ऑफिस, स्टेशन हेड क्वार्टर तसेच संरक्षण खात्याशी संबंधित संवेदनशील कार्यालये आहेत. अशा ठिकाणी या प्रकारचे मोठ्या प्रमाणावरचे बांधकाम सुरक्षा दृष्टीने धोकादायक ठरू शकते.  कुंदन बिल्डरकडून सुरू असलेल्या बांधकामामुळे परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. याच ठिकाणी  17 मजली इमारतीचे काम म्हणजे देशाला भविष्यात धोकादायक ठरू शकते असे निवेदनात प्रभाकर पोलकम यांनी नमूद केले आहे.

  1. याबाबत अधिक माहिती घेण्याकरिता पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असते ते म्हणाले ‘ संरक्षण खात्याच्या  जो 2016 चा जीआर आहे त्यानुसार , संरक्षण खात्याच्या आस्थापनेपासून 10 मीटर च्या आत बांधकाम करायचं असेल तरच डिफेन्स ची एनओसी घ्यावी लागते. संबंधित बांधकाम 10 मीटर पेक्षा लांब आहे. डिफेन्स ने आम्हाला नुकतेच एक पत्र पाठवले आहे त्यानुसार, जुने निकष लागू करा, असे म्हटले आहे. त्यापूर्वीची ही परवानगी आहे असे मला वाटते. बहुधा 2011/12 ची परवानगी असावी.’ असे ही निकम यांनी पुणे पीसीएमसी न्यूज 24 शी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.

  2. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे उत्तम महादू काळभोर व इतर करीता मे. कुंदन अँड जैन डेव्हलपर्स चे भागीदार आशिष जैन व इतर यांना बांधकाम चालू करण्याकरिता दाखला दिला आहे.

पोलकम यांनी यावर भर दिला की, “बिल्डरकडून सर्व्हे व परवानगी प्रक्रिया नीट न तपासता काम सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून, हे काम तात्काळ थांबवून तपास करण्यात यावा.”
त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की
कुंदन बिल्डरचे काम तत्काळ बंद करण्यात यावे.
या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय समितीमार्फत करण्यात यावी.
संबंधित अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी.
या प्रकरणाची प्रत त्यांनी देशातील अनेक वरिष्ठ नेत्यांना पाठविली आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, डीईओ ऑफिस खडकी, कॅन्टोनमेंट बोर्ड, स्टेशन हेडक्वार्टर, तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त, व महापालिका आयुक्त  यांचा समावेश आहे.
स्थानिक नागरिकांनी या निवेदनाचे स्वागत करत प्रशासनाने तात्काळ चौकशी करून परिसरातील सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती घेण्याकरिता कुंदन बिल्डर चे भंवरलाल जैन यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले ‘माझा मुलगा सर्व कामे पहातो तो सध्या पुण्यात नाही’ असे ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्या मुलाचा मोबाईल नंबर मागितला असता त्यांनी नंबर देण्यास नकार दिला त्यानंतर ही दोन वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र जैन यांनी प्रतिसाद दिला नाही

#amnuationfactory#Siddharth shirole#pmc#pcmc#devendra fadanvis#khadkicantonment bord#pune pcmcnews24:Live

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!