पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांना यश
खडकी कॅन्टोन्मेंट मधील नागरिकांना आता महात्मा फुले जनआरोग्य योजना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत शत्रक्रिया उपचार मिळणार
खडकी कॅन्टोन्मेंट / हरीश शर्मा
” खडकी कॅन्टोन्मेंट मधील नागरिकांना मिळाली आरोग्य संजीवनी
छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांतून खडकी कॅन्टोमेंट बोर्ड संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय गेल्या कित्येक दशकं कोणत्याही शासकीय योजनेविना चालत राहिलं परिणामी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांवरील वैद्यकीय खर्च आणि रुग्णालयावर आर्थिक भार वाढत राहिला याचा गंभीरपणे विचार करून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महाराष्ट्र शासनाची सर्वसामान्य कुटुंबाना वरदान ठरणारी प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांपर्यंत वैद्यकीय उपचार मोफत देणारी महात्मा फुले जनआरोग्य योजना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णलयात आणण्याचा चंग बांधला त्यापद्धतीने खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत , माजी सदस्य कमलेश चासकर , खडकी मंडल अध्यक्ष शाम काची, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष योगेश कर्नूर यांनी महायुती सरकारकडे प्रशाकीय यंत्रणेकडे , मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी वरळी मुंबई येथे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ .नागनाथ येमपल्ली , महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयक डॉ. प्रीतीताई लोखंडे , डॉ .विकास गायकवाड , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे निवासी डॉ. रणजित भोसले यांच्या समन्वय – सहकारातून भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला महात्मा फुले जनआरोग्य या सर्वव्यापी आरोग्य योजना मंजुर करून योजनेत समाविष्ट करण्यात यश मिळवलं आहे .मध्यम , गंभीर आजारांवर खडकी कॅन्टोन्मेंट व पंचक्रोशीतील आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना यापुढे फक्त रेशनकार्ड – पिवळे , केसरी , पांढरे , PHH / NPH व आधारकार्ड फक्त या दोन कागदपत्रांवर योजनेत समाविष्ट आजार मोफत करण्याचा आता मार्ग मोकळा झाला आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना कोणतीच सवलत मिळत नव्हती कोणतीही आरोग्य शैक्षणिक राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नव्हता. आता यापुढे खडकीकरांना वेळीच मोफत उपचार मिळणार असल्याने खडकीकरांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे आभार मानले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















