Homeपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक २७ मध्ये लाडक्या बहिणींसाठी ‘न्यू होम मिनिस्टर खेळ...

पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक २७ मध्ये लाडक्या बहिणींसाठी ‘न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ भव्य कार्यक्रम

पिंपळे सौदागर / प्रतिनिधी : दि. १३ डिसेंबर २०२५    माजी सरपंच स्व. गोविंदराव तांबे चारिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मधील महिलांसाठी खास ‘लाडक्या बहिणींसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण ओम यादव करणार आहेत.

या कार्यक्रमात उपस्थित लाडक्या बहिणींसाठी लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. लकी ड्रॉमधून
टू-व्हीलर, टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रिज तसेच मिक्सर अशी मोठी बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. प्रत्येक बक्षिसासाठी प्रत्येकी चार लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या महिलांना ड्रॉ दिला जाणार आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आला असून, स्थळ कापसे लॉन्स, रहाटणी, पुणे–१७ येथे कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन  देविदास (आप्पा) सुमन, गुलाबराव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये, असे आयोजकांनी आवर्जून सांगितले आहे.
लकी ड्रॉसाठी आवश्यक टिप कूपन आधीच कार्यालयात जमा करणे अनिवार्य असल्याची माहितीही आयोजकांकडून देण्यात आली आहे. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या खास कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!