हिंजवडी / प्रतिनिधी : दि. १२ डिसेंबर २०२५ ७ डिसेंबर रोजी गोविंदराव आदिक ऑडिटोरियम, श्रीरामपूर (इतर अहिल्यानगर) येथे विद्याराज फाउंडेशनतर्फे राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यात हिंजवडी हिल्स ( एकझरबिया टाऊनशीप ) मधील “उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शिका” प्रतिक्षा कुलकर्णी यांना “महाराष्ट्र कला गौरव रत्न” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते गणेश यादव यांच्या हस्ते प्रतिक्षा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे चे ज्येष्ठ नेते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुप्रसिद्ध सिने अभिनेते सुनील गोडबोले, अभिनेते सयाजी शिंदे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थित होते.

प्रतीक्षा कुलकर्णी या अत्यंत कुशल व बहुगुणी नृत्यांगना म्हणून ओळखल्या जातात. विविध नृत्यप्रकारांवर त्यांचे प्रभुत्व असून त्यांनी आतापर्यंत अनेक भव्य नृत्य स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मंचांवर उत्कृष्ट प्रदर्शन करून अनेक पुरस्कार पटकावले आहेत. नृत्यकलेबद्दलची त्यांची समर्पित निष्ठा आणि सर्जनशील दिग्दर्शन यामुळे त्या विशेष ठरतात.
फक्त कला क्षेत्रापुरते मर्यादित न राहता प्रतीक्षा कुलकर्णी सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर असतात. महिलांच्या सबलीकरणासाठी, सामाजिक भान जागवण्यासाठी आणि युवकांना सांस्कृतिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी त्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवतात.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















