Homeपुणेपरिवहन विभागाचा प्रतिवर्षी 560 करोड रुपयांचा घोटाळा महिलांच्या सुरक्षितते सोबत खेळ -...

परिवहन विभागाचा प्रतिवर्षी 560 करोड रुपयांचा घोटाळा महिलांच्या सुरक्षितते सोबत खेळ – डॉ.केशव क्षीरसागर

फोटो –  प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक कॅब मध्ये हे  बटन असते  परंतु ते निकामी असते

पुणे पीसीएमसी न्यूज 24: पुणे / प्रतिनिधी

आरटीओ चा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

दरवर्षी परिवहन विभागाचा 560 करोड हून जास्त रुपयांचा घोटाळा होत असल्याचा  पुरावा असल्याचा आरोप महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उघड केला आहे. राज्यामध्ये अंदाजे आठ लाख कॅब्स आहेत. ओला उबेर रॅपिडोसारख्या वाहनांच्या माध्यमातून प्रवास करताना किंवा इतर वेळी कॅब मधून प्रवास करताना प्रत्येक प्रवासी SOS बटन बघत असतील ते बटन आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवाशांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी आहे. महिलांबरोबर चालत्या कॅब मध्ये गंभीर प्रकार घडल्याच्या घटना आपण यापूर्वी ऐकल्या आहेत. काही गुंड प्रवृत्तीचे लोक कॅबच्या माध्यमातून महिलांचे अपहरण करून विनयभंग केल्याच्या बातम्या अनेक वेळा छापून येतात. त्याच सोबत चालत्या प्रवासी वाहनांमध्ये विनयभंग करून महिलांचे खून सुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. एखाद्या महिलेबरोबर कुठलाही गैरप्रकार घडल्यास आपत्कालीन स्थितीमध्ये पोलीस यंत्रणेशी संपर्क साधण्यासाठी ते 🆘 बटन असते.

आज सुद्धा आपण कुठल्याही कॅबमध्ये बसून ते बटन दाबल्यास कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही हे स्वतः तपासू  शकता. ते नावासाठी आहे  ते बटन चालू असल्याचे खात्री केल्याशिवाय राज्यामधील एकाही कॅबची पासिंग होणे अशक्य आहे. कॅबची पासिंग होण्यासाठी ते बटन कार्यान्वैत आहे का नाही हे पासिंग करणाऱ्या RTO ने चेक करणे बंधनकारक आहे. परंतु राज्याचे अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या आदेशाप्रमाणे व परिवहन मंत्र्यांच्या कृपेने राज्यातील सर्व RTO ते बटन बंद असतानाच गाड्यांची पासिंग करत आहेत. त्या मोबदल्यात त्यांची दरवर्षी 560 करोड हून जास्त रुपयांची कमाई या 🆘 रिचार्ज कंपन्यांकडून होत आहे असा आरोप ही डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे. राज्यात अंदाजे आठ लाख दरवर्षी पासिंग होणाऱ्या कॅब जर पकडल्या तर त्यांना 🆘 रिचार्ज सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रतिवर्षी सात हजार रुपयांचे रिचार्ज करावे लागते. ते रिचार्ज केल्यावर त्यांना बोगस सर्टिफिकेट या कंपन्यांकडून दिले जाते परंतु मुळात ते 🆘 बटन कधीच काम करत नाही. तसेच दोन ते तीन वर्षांनी नवीन बटन घेण्यासाठी 12,000 रुपये खर्च करणे लाखो कॅब चालकांना बंधन कारक आहे.

तेच बोगस सर्टिफिकेट घेऊन, खरोखर ते बटन चालू आहे का नाही हे चेक न करता, 2 सेंटिमीटर जरी पिवळे रेडियम गाडीला कमी असेल तरी गाडी नापास करणारे RTO अधिकारी बिन बोभाट पणे महिलांची सुरक्षितता धोक्यात घालून, 🆘 बटन बंद असलेल्या सर्व गाड्यांना पासिंग करून देत आहेत.

याबाबत वेळोवेळी आम्ही राज्याचे परिवहन आयुक्त व अप्पर परिवहन आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करून व निवेदने देऊन, आंदोलने करून सुद्धा आजतागायत त्यांनी याच्यावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही व लाखो महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात घालून कोट्यावधी रुपयांची कमाई राज्यातील सर्व आरटीओ अधिकारी संगनमताने करत आहेत असेही क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!