Homeखडकीनेतृत्व हरपलं… खडकी थांबली! अजितदादा पवार यांच्या निधनाने सर्वपक्षीय स्वयंस्फूर्तीने खडकी बाजार...

नेतृत्व हरपलं… खडकी थांबली! अजितदादा पवार यांच्या निधनाने सर्वपक्षीय स्वयंस्फूर्तीने खडकी बाजार बंद

खडकी | प्रतिनिधी : 28 जानेवारी 2026          महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालक मंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती दुःखद निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, त्याचे तीव्र पडसाद पुणे शहरात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर खडकी परिसरातील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने खडकी बाजार बंदची हाक देण्यात आली आहे.

या आवाहनाला खडकी बाजारातील व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. खडकीतील बहुसंख्य दुकाने आज संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार असून, महाराष्ट्राने एक कणखर, स्पष्टवक्ते आणि विकासाभिमुख नेता गमावल्याच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना दुकानदारांनी व्यक्त केली आहे.
अजितदादा पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याच्या विकासासाठी तसेच पुणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका, ठाम निर्णयक्षमता आणि प्रशासकीय अनुभव यासाठी ते ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य जनतेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
खडकी परिसरात दिवसभर शोकमय वातावरण असून नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
■ ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
शोकाकुल :
सर्व पक्षीय व समस्त खडकी नागरिक व
पुणे पीसीएमसी न्यूज 24.live

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!