Homeखडकीखडकीत शहीदांना अभिवादन; वंदेमातरम संघटनेचे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

खडकीत शहीदांना अभिवादन; वंदेमातरम संघटनेचे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी : दि.  24 मार्च 2026 देशासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे शहीद भगत सिंह, सुखदेव  आणि राजगुरू यांच्या 95 व्या बलिदान स्मृतिदिनानिमित्त तसेच वंदेमातरम गीताच्या निर्मितीच्या 150 व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून वंदेमातरम संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान  शिबिराचे आयोजन करण्यात आले.

खडकीतील आझाद मित्र मंडळाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात तब्बल 75 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.
कार्यक्रमाची सुरुवात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य अभय सावंत यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे व प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना विकास हांडे यांनी “रक्तदान” या शब्दाऐवजी “रक्तसेवा” हा शब्द अधिक योग्य असल्याचे मत व्यक्त केले. “कारण रक्तदान केल्यानंतर शरीरात पुन्हा रक्त निर्माण होते, त्यामुळे हा ‘दान’ नसून समाजासाठीची सेवा आहे,” असे त्यांनी सांगितले.
नामनिर्देशित सदस्य अभय सावंत यांनीही संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. शिबिरात महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शहीदांना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे  प्रास्ताविक खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश काकडे यांनी मानले. याप्रसंगी अॅड. इंद्रकुमार बन्सल, शरद रोच, महादेव नाईक,अॅड. घाणेकर, जितेंद्र परदेशी गणेश जगताप अॅड. पांडुरंग कोरके आदी मान्यवर तसेच विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे राजेश राजपूत, अॅड. योगेश आहेर, दीपक चार्या, विनोद काळे, करण चव्हाण, प्रसाद अवरादी व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व रक्तदात्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या शिबिरासाठी आझाद मित्र मंडळ व पीएसआय ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!