-

Oplus_ पुणे पीसीएमसी न्यूज : खडकी / बातमीदार
- नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) हे भारतीय शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडवणारे ऐतिहासिक पाऊल आहे. Autonomy असलेल्या महाविद्यालयांची भूमिका या नव्या पर्वात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी केले.
ते खडकी येथील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय ऑटोनोमी झाल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना म्हणाले: “ऑटोनॉमी ही केवळ स्वायत्तता नव्हे, ती जबाबदारी आहे. अभ्यासक्रम रचना, मूल्यांकन, आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यामध्ये स्वायत्त महाविद्यालयांनी आता पुढाकार घेतला पाहिजे. NEP 2020 ही शिक्षणाच्या सर्जनशीलतेची संधी आहे.” त्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी नव्या शैक्षणिक संकल्पनांकडे असलेले उत्तरदायित्व, संशोधनातील नवे प्रवाह, डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थी केंद्रित शिकवणीसंबंधी सखोल विवेचन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे होते. - ते म्हणाले, “स्वायत्त महाविद्यालयांनी NEP 2020 च्या अंमलबजावणीत नेतृत्व करण्याची वेळ आली आहे. अशा मार्गदर्शनामुळे प्राध्यापकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी केले यावेळी
महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. सुचिता दळवी, महादेव रोकडे, राजेंद्र लेले उपस्थित होते. विभागांतील प्राध्यापकांनी आपले अनुभव मांडले आणि महाविद्यालयाच्या गुणात्मक उत्कर्षासाठी व अंमलबजावणीसाठी संकल्प करण्याचा निश्चय केला

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














