पुणे / प्रतिनिधी : दि. 6 नोव्हेंबर
इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांच्या वतीने आयोजित “इंस्टा रील्स आयकॉनिक अवॉर्ड 2025” हा भव्य सोहळा पुण्यात अतिशय उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात भारत भरातील अनेक कलावंत, सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमींचा सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अविनाश बगवे, अभिजित बिचकुले लायन बॉबी कर्णानी, योगेश गोंधळे आणि सुनील हिरुरकर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट रील क्रिएटर पुरस्कार प्राप्तकर्ते :
लीना बोरहाडे, सोनाली चिद्दरवार, आर्किटेक्ट सेजल पटेल, सुनीता खरालिया, टिंकू रायचंदानी, नीटू झा, शुभ्रा भोसले, सुदेश गायकवाड, श्रीकांत तिलावे, यशश्री राजभरत, लतेन्द्र भिंगारे, अलका सुभाष माकर व ह.भ.प. सुभाष माकर, डॉ. जोहर चुनावाला.
या भव्य सोहळ्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करणाऱ्या सर्जनशीलतेचा गौरव करण्यात आला. सर्व सन्मानितांना त्यांच्या कार्यासाठी आणि सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी फेरोज खान इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स उपाध्यक्ष सुनील साठे आणि इव्हेंट डायरेक्टर पारूल गुप्ता यांनी सर्व पाहुणे, पुरस्कार विजेते आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी या कार्यक्रमाला संस्मरणीय बनवल्याबद्दल उपस्थितांचे अभिनंदन करत “सर्जनशीलता आणि समाजसेवा हेच खरी प्रगतीची दिशा आहे” असा संदेश दिला.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















