हिंजवडी / प्रतिनिधी : दि. २४ नोव्हेंबर २०२५ शहरापासून ग्रामीण भागापर्यंत बिबट्यांच्या हालचालीत मोठी वाढ झाल्याचे समोर येत आहे. पूर्वी केवळ जंगल परिसरात दिसणारा बिबट्या आता पुणे ग्रामीण, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, हिंजवडी, नेरे दत्तवाडी, कासारसाई, दारुब्रे , शिरगाव तसेच शहरातील औंध, घोरपडे पेठ यांसारख्या शहरी वस्त्यांमध्येही दिसू लागला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
याबाबत पुणे पीसीएमसी न्यूज 24 च्या प्रतिनिधीने मुळशी वनविभाग परिक्षेत्राचे वनाधिकारी प्रताप जगताप यांच्याशी संपर्क करून थोडी माहिती घेतली आहे वनविभागाकडील माहितीनुसार, ‘अन्नाचा अभाव, जंगलांचे घटते क्षेत्र आणि वाढती मानवी वस्ती यामुळे बिबटे मानवी वस्त्यांकडे अधिक प्रमाणात येत आहेत. पाळीव जनावरे, मोकाट कुत्री तसेच उघड्यावर ठेवलेला कचरा ही देखील बिबट्यांना आकर्षित करणारी कारणे मानली जातात. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू किंवा गंभीर जखमी झाल्यास शासनाची मदत मिळते बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये नागरिक जखमी होण्याचे किंवा मृत्यू होण्याचे प्रकार वाढत असल्याने राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मदत धोरणाची माहिती प्रत्येक नागरिकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 1) हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाख रुपये आर्थिक मदत जर बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या वारसाला चोवीस तासाच्या आत १० (दहा लाख) रुपयांचा धनादेश देण्यात येतो व उर्वरित 15 लाख रुपये वारसांच्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझिट करण्यात येते. ही नुकसानभरपाई म्हणून शासनाकडून देण्यात येते. 2) कायमचे अपंगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रुपये, तसेच हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आले, चालणे फिरणे किंवा दैनंदिन कामे करण्यास अडचण निर्माण झाली, तर त्याला 7 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध आहे. 3) इतर जखमा झाल्यास उपचार खर्चाची मदत हल्ल्यात किरकोळ किंवा मध्यम स्वरूपाच्या जखमा झाल्यास देखील उपचारासाठी शासनाकडून मदत मिळू शकते. उपचार खर्चाचा दावा संबंधित वनक्षेत्र कार्यालयात करता येतो.
नुकसानभरपाई मिळवण्यासाठी प्रक्रिया मृत व्यक्ती किंवा जखमी याबाबत पोलिस आणि वनविभागाकडून पंचनामा उपचाराचा रिपोर्ट मृत्यू प्रमाणपत्र अपंगत्वासाठी वैद्यकीय मंडळाचा तपशीलवार अहवाल अर्ज संबंधित वनविभागाच्या कार्यालयात सादर करणे दस्तऐवजांची पडताळणी झाल्यानंतर शासनाकडून मदत थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.

रात्री किंवा पहाटे निर्जन भागात एकटे जाणे टाळावे कचरा व अन्न उघड्यावर न टाकणे ,मोकाट कुत्र्यांना अन्न देणे टाळावे यामुळे बिबटे त्या परिसरात आकर्षित होतात संशयास्पद हालचाल दिसल्यास लगेच 1926 वनविभाग किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावे घरांच्या परिसरात पुरेसे उजेड ठेवणे अशी माहिती प्रताप जगताप यांनी ‘पुणे पीसीएमसी न्यूज:24 ‘ ला दिली.
पुणे आणि आसपासच्या परिसरात बिबट्यांची वाढती हालचाल आता चिंतेचा विषय ठरत आहे याकरिता वनपरिक्षेत्राच्या जवळ असलेल्या सोसायट्यांनी ही काळजी घ्यावी सीमाभिंत किंवा तारेचे कुंपण तसेच सगळीकडे उजेड ठेवावे, तसेच नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाशी समन्वय ठेवणे अत्यावश्यक आहे. संभाव्य धोका कमी करण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून जनजागृती, पिंजरे लावणे व मॉनिटरिंगचा वेग वाढविण्यात आला आहे.
शासनाने जाहीर केलेली नुकसानभरपाईची योजना ही पीडितांसाठी दिलासा देणारी आहे; मात्र सुरक्षितता आणि जागरूकता हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
( छायाचित्र – संग्रहित )

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















