
पुणेपीसीएमसी न्यूज 24 : पिंपरी / प्रतिनिधी
‘वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा’ या वाहतूक पोलीस विभागाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे पोलीस जनजागृती करीत असतात वेळप्रसंगी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड ही ठोठावतात .मात्र जर पोलीस च वाहतुकीचे नियम मोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणार कोण ? असा सवाल आता उपस्थिती होत आहे ‘ पिंपरी येथील आंबेडकर स्मारक चौकात एक महिला पोलीस कर्मचारी रविवार 3 ऑगस्ट दुपारी झेब्रा क्रॉसिंग वर विना हेल्मेट आपली दुचाकी घेऊन सर्रासपणे थांबल्या होत्या सिग्नल वर थांबलेले अनेक वाहनचालक त्यांना पाहून एकमेकांशी कुजबुजत होते ‘बघा पोलीस च वाहतुकीचे नियम मोडत आहेत’
त्यामुळे या नियम मोडणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस दंड करतील का ? जर कायदा सर्वांना समान आहे तर पोलिसांनाही तो लागू होतोच अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी यावेळी व्यक्त केली .

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














