Homeक्राईमपोलिसांकडून गैरवर्तनाचा आरोप; खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

पोलिसांकडून गैरवर्तनाचा आरोप; खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

खडकी / प्रतिनिधी : दि. २५ नोव्हेंबर २०२५              खडकी बाजार परिसरातील राहुल अवचिते नामक  एका नागरिकाने पोलिसांकडून गैरवर्तन, धमकी आणि जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप करीत औपचारिक तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीने लिहिलेल्या निवेदनानुसार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री पोलिसांनी त्याला विनाकारण अडवून मारहाण करत चुकीच्या पद्धतीने वागणूक दिल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तो कामावरून घरी परतत असताना दोन बिट मार्शल  पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवून चौकशी केली. त्यावेळी त्यांना योग्य स्पष्टीकरण दिल्यानंतरही पोलिसांनी गैरशब्द वापरल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याचा मोबाईल फोन जप्त करून तो परत देण्यास विलंब झाल्याचेही म्हटले आहे.
निवेदनात असेही राहुल अवचिते यांनी असे ही  नमूद केले आहे की, तक्रारदाराने मदतीसाठी 112 वर कॉल करतो  असे सांगितल्यावर ‘तुला कुठे कॉल करायचे तिथे कर ‘ असे पोलिसांनी सांगितले  त्यानंतरही परिस्थिती बिघडत गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढील दिवशी त्याच्या परिचितांच्या मदतीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात जावे लागल्याचेही पत्रात नमूद आहे.
तक्रारदाराने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी खडकीतील सामाजिक कार्यकर्ते बबलू पोलकम, भरतसिंग ठाकूर, अभिजित गडांकुश, यांनी खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली त्यानंतर पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी घडलेल्या प्रकारची कायदेशीर चौकशी करून योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले.
या प्रकरणाबत आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने संबंधित विभागाकडून अंतर्गत चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!