पिंपरी | प्रतिनिधी : दि. 24 एप्रिल 2026
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून नागरिकांना पुरवले जाणारे पिण्याचे पाणी दूषित असल्याचा गंभीर आरोप बहुजन भीम सेनेने केला असून, याबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या पाण्यामुळे पोटदुखी, मळमळ, उलट्या-जुलाब यांसारख्या आजारांचा त्रास वाढत आहे. झोपडपट्टी व ग्रामीण भागातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून, त्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
महानगरपालिकेकडून स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दूषित पाण्यामुळे भविष्यात साथरोग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा येणाऱ्या 30 एप्रिल 2026 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी येथे आंदोलन सुरू करण्यात येणार असा इशारा बहुजन भीम सेनेतर्फे मोहन भागवत म्हस्के – संस्थापक/अध्यक्ष, बहुजन भीम सेना
बाबुराव पवार – सचिव, बहुजन भीम सेना
नारायण लोखंडे – सहसचिव, बहुजन भीम सेना, इंदुताई सोनवणे – अध्यक्षा, बहुजन भीम सेना महिला आघाडी यांनी दिला आहे.
तसेच बहुजन भीमसेन ने खालील मागण्या केल्या आहेत.
स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तात्काळ करावा
दूषित पाण्याच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















