Homeपुणेघरेलू कामगार महिलांपर्यंत पोहोचली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना; पुण्यात विशेष नोंदणी शिबिर

घरेलू कामगार महिलांपर्यंत पोहोचली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना; पुण्यात विशेष नोंदणी शिबिर

पुणे महापालिका आरोग्य विभाग व महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शनही

पुणे | प्रतिनिधी : दि. 30  जून 2026                    पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा लाभ अधिकाधिक घरेलू कामगार महिलांना मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना, पुणे जिल्हाच्या वतीने श्री समर्थ मंडळ हॉल, पुणे येथे गुरुवार (दि. २५ जून २०२६) रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात संघटनेच्या शासकीय नोंदीतील घरेलू कामगार महिलांची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्डासाठी नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. तसेच नोंदणी प्रक्रियेसाठी सहकार्य करणाऱ्या आशा वर्कर्सचाही गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा  नाईक, परिमंडळ आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाडगे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली टिळेकर, परिमंडळ परिचारिका सारिका लडकत, क्षेत्रीय परिचारिका सुजाता पुणेकर, पब्लिक हेल्थ मॅनेजर डॉ. किरण सोनटक्के, निवृत्त प्राध्यापिका शोभना आपटे, प्रदेश सरचिटणीस शरद पंडित, ॲड. रश्मी तांदळे, समर्थ मंडळाचे चिटणीस सतीश चिटणीस तसेच प्रदेश उपाध्यक्ष मीना पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. मनीषा विनोद नाईक यांनी घरेलू कामगार महिलांना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य सुविधांची माहिती दिली. तसेच घरेलू कामगार महिलांसाठी महानगरपालिकेच्या दवाखान्यांच्या माध्यमातून विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. किरण सोनटक्के यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत या शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुवर्णा कोंढाळकर, मंदा पवार, शैला शिंदे, सुनिता बढे, योगिता शिंदे, शीला आटपाळकर, शोभना लालन, अनिता गुरव, यशोदा साळवे, जनाबाई कुडले, वर्षा ताडे, नीता पंखावाला, मंगल भोसले, शीला तांदळे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिराला घरेलू कामगार महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!