Homeपुणेसामाजिक न्याय विभागाकडून १६ गटई कामगारांना स्टॉलचे वाटप; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल

सामाजिक न्याय विभागाकडून १६ गटई कामगारांना स्टॉलचे वाटप; स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल

चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना व्यवसाय विस्तारासाठी मदत; सामाजिक व आर्थिक उन्नतीला चालना

पुणे |प्रतिनिधी : दि. 1 जुलै 2026                    अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील गटई कामगारांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय विभागामार्फत १६ लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वितरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना स्टॉलचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे होते. यावेळी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, संत रोहिदास समाज उन्नती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजू रतन बनसोड, संत रोहिदास महामंडळाचे विभागीय अधिकारी अमोल शिंदे तसेच गटई स्टॉलचे लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले की, शासनाच्या या उपक्रमामुळे चर्मकार समाजातील गटई कामगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळेल. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर आणि लाभार्थ्यांचा संविधानाच्या उद्देशिकेची प्रत व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विशेष अधिकारी श्रीमती माधुरी वाघमोडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. लाभार्थी अमोल शिंदे आणि संजय बनसोड यांनी मनोगत व्यक्त करत शासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र लोहार यांनी केले, तर आभार प्रदर्शन चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाचे व्यवस्थापक अमोल शिंदे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!