हिंजवडी / प्रतिनिधी : दि. २७ ऑक्टोबर — नेरे दत्तवाडी येथील हिंजवडी हिल्स सोसायटी फेज 2 मधील बिल्डिंग C7 मध्ये गेल्या चार दिवसांपासून दुचाकी पार्किंग परिसरात शौचालयाच्या ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे सर्वत्र घाण पसरली असून, रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
oplus_34
रहिवाशांच्या वतीने येथील रहिवासी हरीश शर्मा यांनी या संदर्भात अधिकृत मेंटेनन्स तिकीट नोंदवूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. संबंधित रहिवासी हरीश शर्मा सांगतात की, “मी चार दिवसांपूर्वी तिकीट रेस करूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आज पुन्हा सोसायटी कार्यालयात जाऊन व्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी यांना विचारले असता, त्यांनी ‘अर्धा तास द्या’ एवढेच उत्तर दिले. पण चार दिवस झाले तरी काम सुरु झालेले नाही.”
पार्किंग परिसरात सर्वत्र शौचा ची घाण आणि दुर्गंधी पसरली असून, आरोग्य धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत कमिटी चेअरमनलाही संपर्क साधला असला तरी अद्याप ठोस पाऊल उचलले गेलेले नाही.
रहिवाशांच्या मते, “मेंटेनन्स वेळेवर भरतो, मग काम का होत नाही? कर्मचारी आणि व्यवस्थापक एकमेकांकडे बोट दाखवतात. सोसायटी प्रशासनात कुठेतरी गंभीर दुर्लक्ष आणि गडबड दिसते.”
या निष्क्रियतेमुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सोसायटी प्रशासनाकडून रहिवाशीयांच्या कोणत्याही समस्यांवर समाधान होत नसल्यामुळे कमिटी चेरमन सेक्रेटरी यांनी याबाबत खुलासा करावा अन्यथा कायदेशीर बाबी अवलंबून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशीयांनी दिली आहे.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप
नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026
गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप
नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026
गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...