प्रभाग 28 अ मध्ये राष्ट्रवादीचा झंझावात; उमेश काटेंचा प्रचार शिखरावर हरीश शर्मा | मुख्य संपादक ९८२२२२००९० पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 28 अ (सर्वसाधारण) मध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्वच पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. अशा परिस्थितीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उमेश गणेश काटे हे प्रभागात प्रभावीपणे प्रचार करताना दिसत आहेत.
परंपरा + प्रगती = उमेश काटे; पिंपळे सौदागरमध्ये राष्ट्रवादीचा जोर रहाटणी–पिंपळे सौदागर परिसरात घरोघरी संपर्क, पदयात्रा, बैठका आणि कोपरा सभा यांद्वारे उमेश काटेंचा प्रचार वेग घेत असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विशेषतः तरुण, महिला आणि जेष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे चित्र आहे.
उमेश काटेंची ओळख ही केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारे आणि आधुनिक शिक्षण घेतलेले नेतृत्व अशी आहे. आजोबा श्री. विठ्ठल कोंडीबा काटे यांनी सुरू केलेली काकडा आरती व वारीची परंपरा आजही त्यांच्या कुटुंबाकडून जपली जात असून, याच संस्कारातून समाजसेवेची बीजे रोवली गेली आहेत.
MBA, BSc (Computer) शिक्षणाच्या जोरावर त्यांनी Pleco उपक्रमाच्या माध्यमातून
🔹 युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण
🔹 महिलांसाठी स्वावलंबन
🔹 स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर तत्काळ मदत
अशी ठोस कामे केली आहेत.


वेगाने वाढणारा पिंपळे सौदागर प्रभाग हा केवळ निवासी भाग न राहता व्यवस्थित नियोजन, पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणी आणि नागरिक सुविधा यांसाठी सक्षम नेतृत्वाची मागणी करत आहे.
“केवळ आश्वासने नव्हे, तर नियोजनबद्ध विकास हाच माझा अजेंडा आहे,” असा ठाम विश्वास उमेश काटेंनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) ची संघटनात्मक ताकद, स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि उमेश काटेंची स्वच्छ प्रतिमा यामुळे प्रभाग 28 अ मधील निवडणूक लढत दिवसेंदिवस रंगतदार होत असल्याचे चित्र आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















