पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर
लागा तयारीला
पुणे / हरीश शर्मा
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये मतदार यादी प्रकाशन, हरकती–सूचना स्वीकृती, तसेच अंतिम मतदार यादी जाहीर करण्याच्या तारखा निश्चित केल्या आहेत.
निवडणूक आयोगाकडून जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार,
८ ऑक्टोबर २०२५ रोजी मतदार यादीचा प्रारूप प्रकाशित करण्यात येईल.
८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान नागरिकांना आपली नावे, दुरुस्त्या, वगळणी किंवा नव्या नोंदींसाठी हरकती व सूचना दाखल करता येतील.
त्यानंतर तपासणीची प्रक्रिया पार पडून २७ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर होणार आहे.
राज्यातील ३२ जिल्हा परिषद व ३३६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार असून, त्यानंतर नामनिर्देशन, अर्ज तपासणी, प्रचार व मतदान यांचे वेळापत्रक आयोग वेगळे प्रसिद्ध करणार आहे. नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार असून, आरक्षण आणि प्रभागरचना याआधीच निश्चित केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरणाला सुरुवात झाली असून, सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















