रहाटणी प्रभागात विकासकामांवर जोर
आमदार जगताप यांच्या पुढाकाराने कामांना वेग
पिंपळे सौदागर / प्रतिनिधी : दि १२ नोव्हेंबर रहाटणी प्रभाग क्रमांक २७ येथे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी काळेवाडी भारतीय जनता पार्टी माजी मंडल अध्यक्ष देविदास उर्फ आप्पा तांबे यांनी विविध विकासकामांना सुरुवात केली आहे. रहाटणी परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेले आर्य सुखवणी, हरित शिल्प, आदिअम्मा, रोहित प्लाम्स, डिवाइन ड्यू या सोसायट्यांच्या परिसरातील डांबरीकरणाचे काम आज सुरू करण्यात आले.

या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. रहाटणी परिसरातील रस्ते व सुविधा सुधारण्यासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















