पुणे पीसीएमसी न्यूज24:Live
पुणे / प्रतिनिधी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रकाश केशवराव देवळे यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती आणि काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
प्रकाश देवळे यांनी दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहून जनतेची सेवा केली. शिरगाव परिसरातून त्यांनी शिवसेनेचे संघटन मजबूत केले. १९९६ मध्ये विधानपरिषदेवर निवडून येताना त्यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना दिलेला पराभव राजकीय वर्तुळात गाजला होता. पक्ष संघटनेसाठी सातत्याने काम करणारा निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.
राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतूनही त्यांनी ठसा उमटवला. शिरगाव येथे त्यांनी साई मंदिर उभारून भक्तांसाठी एक केंद्र उभे केले. समाजकार्य, लोकसंपर्क आणि संघटन कौशल्य यामुळे ते सर्वदूर परिचित झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















