औंध–बोपोडी प्रभाग ८ मध्ये प्रचाराची धडपड, पण विकासाचा अजेंडा बेपत्ता! हरीश शर्मा | मुख्य संपादक औंध–बोपोडीतील प्रभाग क्रमांक ८ मध्ये महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असला तरी प्रचारातील आशयावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विविध पक्षांकडून तिकीट न मिळाल्यामुळे पक्ष बदलून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे.
मात्र प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांकडे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका किंवा विकासाचा स्पष्ट अजेंडा नसल्याचे चित्र समोर येत आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, स्वच्छता, आरोग्य सुविधा बोपोडी हैरिस ब्रिज जवळ रखडलेले प्रकल्प, बोपोडी येथील नवीन रुग्णालय तयार असून ही उडघटनाच्या प्रतीक्षेत, सोसायट्यांमधील मूलभूत प्रश्न, यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मौन बाळगले जात असून त्याऐवजी अप्रत्यक्ष आरोप-प्रत्यारोपांवर भर दिला जात आहे.
विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या प्रचारात कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता, पूर्वी ज्या पक्षात कार्यरत होते त्या पक्षावरच सूचक टीका केली जात असल्याचे दिसून येत आहे. वैचारिक संघर्षाऐवजी वैयक्तिक नाराजीचे प्रदर्शन प्रचारात अधिक ठळक होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
प्रभाग ८ औंध–बोपोडी
प्रचार जोरात सुरू…
पण मुद्दे कुठे आहेत?
तिकीट न मिळाल्याने पक्षांतर,
आता अप्रत्यक्ष आरोप-प्रत्यारोपांचा खेळ!
विकास आराखडा नाही,
नागरिक प्रश्नांवर मौन!
मतदार आता काम पाहणार की शब्द?
पुणे पीसीएमसी न्यूज 24.Live
आतील बातमी आम्ही बाहेर काढतो.
प्रभागातील सुज्ञ मतदार आता भावनिक भाषणांपेक्षा ठोस कामगिरी, पारदर्शक भूमिका आणि भविष्यातील विकासाचा आराखडा मागत आहेत. प्रचाराचा हा गोंगाट शेवटी मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देतो की फक्त राजकीय कुरघोडीपुरताच मर्यादित राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















